एक्स्प्लोर

Crime News : सहा हजाराची उधारी मागितली म्हणून, मित्राने मित्राचीच केली हत्या

Crime in Aurangabad: उधारी दिलेले पैसे मागणे एकाच्या जीवावर बेतले आहे. अवघ्या सहा हजार रुपयांच्या उधारीवरून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली.

Crime News in Maharashtra :  अगदी जवळच्या मित्राने अवघ्या ६ हजार रुपयांच्या उधारीवरून खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासात उलगडा केला असून आनंद टेकाळे नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शेषराव जाधव हा मित्राच्या वाढदिवसाला जात असल्याचं सांगून १५ डिसेंबर रोजी घरातून बाहेर पडला होता. पण रात्री उशिरापर्यंत घरी आलाच नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली. मात्र तरीही कोणतीही माहिती मिळत नसल्याने सिडको पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.

मध्यरात्र होऊनही  कृष्णा घरी पोहचला नसल्याने घरच्या लोकांची काळजी वाटली त्यांनी अनेकदा त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन लागत नव्हता. त्यांनी मित्रांना विचारपूस केली मात्र मित्रांकडून नाही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. मित्रांकडे विचारपूस केल्यानंतरही काहीच माहिती मिळत नसल्याने कृष्णाच्या कुटुंबातील सदस्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठत, बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. अखेर कृष्णाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत कृष्णाचे कॉल डिटेल्स काढले होते. ज्यात कृष्णा आणि त्याचा मित्र आनंद टेकाळे यांच्यात शेवटचं संभाषण झाले असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आनंदला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता, आंनदकडे कृष्णाची ६ हजार रुपयांची उधारी होती. त्यामुळे कृष्णा सतत उधारीचे पैसे मागत असल्याने आंनदला याचा राग यायचा. म्हणून बुधवारी कृष्णाला दारू पाजतो म्हणून हिमायतबाग परिसरात आनंद घेऊन बसला. दारू पेत असतानाचा पुन्हा उधारीच्या पैश्यावरून वाद झाला आणि आनंदने कृष्णाचा थेट खून केला. 

दोघेही होते  जवळचे मित्र पण....

कृष्णा आणि आंनद दोघेही अनेक दिवसांपासून जवळचे मित्र होते. आनंद हा एमजीएम महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. दोघेही जवळचे मित्र असल्याने त्यांचे चांगले संबंध होते. मात्र आनंदने काही दिवसांपूर्वी कृष्णाकडून ६ हजार रुपये उधार घेतले होते. पण वेळेत देणं झालं नसल्याने कृष्णा सतत पैश्याची मागणी करत होता. त्यानंतर आनंदाने कृष्णाला पार्टी देण्याच्या बहाना करत घराबाहेर बोलवलं दोघांनीही माहित बागेमध्ये पार्टी केली. त्यावेळी कृष्णाने आपल्या उधारीची आठवण आनंदला करून दिले दोघात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली बाचाबाची झाली आणि त्यानंतर केवळ सहा हजार रुपयासाठी आनंदने कृष्णावर चाकूने सपासप वार केले गळा चिरला. एवढ्यावरच न थांबता शरीरावर पुनःपुन्हा वार करून आपल्या मित्राचे आयुष्य संपवलं .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget