एक्स्प्लोर

मुकादमने हातगाडी ओढायचे काम दिले नाही, ज्याला दिले त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या; आरोपीला अटक

मुकादमने आपल्याला डावलून दुसऱ्याला काम दिल्याच्या रागातून एकाने फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला आहे. 

मुंबई : मुकादम हातगाडी ओढायचे काम देत नाही तर ज्याला काम दिलं त्याची रागात डोक्यात दगड घालून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही सगळी थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजमुल सलमानी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

ही घटना जेजे मार्ग जवळ असलेल्या सुर्ती मोहल्ला येथील फुटपाथवर घडली आहे. अजमुल सलमानी या आरोपीने त्याचा मुकादम जाबिर खान याच्याशी काल रात्री काम देत नसल्यामुळे भांडण केले होते. यामुळे जाबिर याने जेजे मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात एनसी दिली. मात्र पोलीस ठाण्यातून बाहेर येऊन अजमुल सलमान हा जाबिर खानची हत्या करण्याचा दृष्टीने शोध घेत होता. मात्र जाबिर त्याला सापडला नाही. म्हणून त्याने अजमुलच्या जागेवर ज्याला काम दिले होते त्या अकबर अलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. दुकानाच्या समोर अकबर अली गाढ झोपेत असताना त्याच्या डोक्यात भला मोठा दगड अजमुलने घातला आणि पळ काढला.

आजूबाजूच्या लोकांनी जखमी अवस्थेत असलेल्या अकबरला जेजे हॉस्पिटल मध्ये दाखल केले. सध्या ते कोमात आहे. तर घटनेची माहिती मिळताच दोन तासात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीला भायखळा रेल्वे स्थानकातून अटक केली. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जाबिर खान या त्याच्या मुकादमने केली आहे.

अगदी क्षुल्लक अशा कारणावरून घडलेल्या घटनेमुळे एका निरपराध माणसाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यामुळे आता अजमुलला किती काळाची शिक्षा होते हे पाहणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget