एक्स्प्लोर
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा
पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि धमकीचा गुन्हा निगडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आपल्या प्रभागातील कामाचं श्रेय इतर नगरसेवकांनी घेतल्याचं हे प्रकरण आहे. 16 मार्च रोजी ही घटना घडली असून 18 मार्च रोजी गुन्ह्याची नोंद झाली आहे.
जावेद शेख यांनी संबंधित 25 वर्षीय महिलेस स्वतःच्या कार्यालयात फोन करुन बोलावून घेतले आणि प्रभागातील विकास कामांवरुन अश्लील शिवीगाळ सुरु केली. "कामाचा पाठपुरावा मी करायचा आणि श्रेय दुसरे नगरसेवक कसे काय घेऊन जातात. मी आजवर 40 ते 50 गुन्हे केले आहेत. तू माझं काहीही करु शकत नाहीस. मी साईटवर आल्याशिवाय एक वीटही हलली तरी मी तुमच्याकडे बघून घेईन," अशी धमकी शेखने दिल्याचा महिलेने आरोप केला आहे. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि धमकीचा गुन्हा निगडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
राँग साईडने यायचं आणि पोलिसांना 'सांग रे तुझं बक्कल नंबर म्हणायचं' हे चालणार नाही : अजित पवार
जावेद शेख यांनी याआधी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुशील लवटे यांच्या चेहऱ्याला काळे फासून व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली होती. शेख यांच्याकडून अशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
इतर गुन्हेगारांना अटक करणारे पिंपरी चिंचवड पोलीस आता राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक अटक करणार का? सत्ता येताच कायदा हातात घेऊ नका, सत्तेचा गैरवापर करुन कायदा हातात घेणाऱ्यांची गय करणार नाही, असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला पक्षाच्याच नगरसेवकाने हरताळ फासला आहे. त्यामुळे अजित पवार आता काय काय भूमिका घेणार? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
2017 मधील गुन्हा
यापूर्वी तामिळनाडू प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावल्याप्रकरणी नगरसेवक जावेद शेख यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत सट्टा लावण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, लॅपटॉप, मोबाईल आणि रोकड असा 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. चिखली येथील मित्तल बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये हा सट्टा सुरु होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement