एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्का, अध्यक्षच स्थायी समितीतून बाहेर
स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. त्यापैकी निम्मे म्हणजे आठ सदस्य 28 फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत.
पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या लॉटरीत पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही सत्ताधारी भाजपला झटका बसला आहे. विद्यमान अध्यक्ष सीमा सावळे यांच्यासह भाजपचे 6, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतून बाहेर पडले आहेत.
स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. त्यापैकी निम्मे म्हणजे आठ सदस्य 28 फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. त्यानुसार आज झालेल्या लॉटरीत विद्यमान अध्यक्ष सीमा सावळे यांचीच पहिली चिट्ठी निघाली. सावळे यांच्यासह भाजपचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. तर उर्वरित 8 सदस्य आणखी एक वर्ष स्थायी समितीमध्ये राहणार आहेत.
आजच्या लॉटरीत 8 पैकी सहा महिलांची नावे चिठ्ठीमध्ये निघाली. एकीकडे हे सर्व घडत असताना स्थायी समितीत भाजपचे 10 आणि अपक्ष एक अशा 11 सदस्यांनी शहाराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत. भाजपचे 77 आणि अपक्ष 5 असे एकूण 82 नगरसेवकांपैकी 55 नगरसेवकांना, पाच वर्षात स्थायी समितीमध्ये काम करण्याची संधी मिळावी. या हेतून हा नवा पायंडा भाजपकडून पाडला जात आहे. महापालिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत आहे. मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्कामोर्तब करतील, तेव्हाच या पायंड्याचा शुभारंभ होईल.
स्थायी समिती सदस्य पक्षनिहाय आकडेवारी :
- भाजप - 10
- राष्ट्रवादी - 4
- शिवसेना - 1
- अपक्ष - 1
- सीमा सावळे - अध्यक्ष, भाजप
- कुंदन गायकवाड - भाजप
- उषा मुंढे - भाजप
- हर्षल ढोरे - भाजप
- कोमल मेवानी - भाजप
- आशा शेंडगे - भाजप
- अनुराधा गोफने - राष्ट्रवादी काँग्रेस
- वैशाली काळभोर - राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीतून विद्यमान अध्यक्ष बाहेर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement