एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पादचाऱ्यांना बेदम मारुन पिंपरीत बाईकस्वारांनी मोबाईल लुटले
पिंपरीत दोघा पादचारी तरुणांना दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटलं
![पादचाऱ्यांना बेदम मारुन पिंपरीत बाईकस्वारांनी मोबाईल लुटले Pimpri : bike riders beat pedestrians and snatches mobile phones पादचाऱ्यांना बेदम मारुन पिंपरीत बाईकस्वारांनी मोबाईल लुटले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/03185518/Pimpri-Mobile-chor-cctv-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये शस्त्राच्या धाकाने काय घडेल, याचा नेम राहिलेला नाही. कोयता दाखवून दुचाकीस्वारांनी पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला, तर दुसरा तरुण मोबाईल सोडत नसल्याने त्याला बेदम चोप देऊन मोबाईल लुटण्यात आला.
कुदळवाडीतील घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोघा पादचारी तरुणांना दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून अडवलं. एकाचा मोबाईल हिसकावून घेतला, दुसरा तरुण मात्र मोबाईल द्यायला तयार नव्हता.
हा प्रकार सुरु असतानाच आणखी एका दुचाकीवर तिघे जण आले. त्या सर्वांनी तरुणाला बेदम चोप दिला आणि मोबाईल लुटला. चोरट्यांच्या हातात कोयते असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे इतर नागरिकही मदतीला जायला धजावत नव्हते.
निगडी पोलिस सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहे. पण या टोळीमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
पाहा सीसीटीव्ही फूटेज :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बॉलीवूड
पुणे
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)