एक्स्प्लोर

ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या मोटारीवर हल्ला; दृष्टीहीन व्यक्तीने फोडली काच

Pimpri Attack on Commissioner Car :  प्रशासनाचा वेळकाढूपणा आणि समस्यांचं निराकरण करण्याची पद्धत यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. आता या घटनेनंतर पालिका आयुक्तांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

पुणेपिंपरी चिंचवड महापालिकेत स्वातंत्र्य दिन साजरा होत असतानाच पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक दृष्टिहीन व्यक्तीचा ही समावेश आहे. प्रशासनाने समस्या न सोडविता जाणीवपूर्वक त्रास दिला. असा आरोप करत दोघांनी हे पाऊल उचललं. ध्वजारोहण झाल्यावर पालिका आयुक्तांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली अन पालिकेतच एकच खळबळ उडाली. 

पालिकेच्या मुख्य इमारतीत स्वतंत्र दिन साजरा होत होता. आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वजारोहण केलं, त्यानंतर पालिकेने आयोजित केलेले काही  कार्यक्रम सुरू होते. 
 राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत सुरू होते. त्याचवेळी अजय गायकवाड यांने काठीने आयुक्त सिंह यांच्या मोटारीची काच (Pimpri Attack on Commissioner Car )  फोडली.  

काचा फोडण्याचे कारण... 

पोलिसांनी तत्काळ गायकवाड यांना ताब्यात घेतले. चालकाने तत्काळ मोटार हलविली. ध्वजारोहण सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. आयुक्त सिंह हे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुसऱ्या मोटारीने रवाना झाले. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीनं या दोघांना शांत केलं. या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, हे कारण शोधण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. माझ्या टपरीवर वारंवार कारवाई केली जातीये, ऊसाच्या रसाचे गुऱ्हाळ टाकण्यासाठी परवानगी दिली नाही, रमाबाई आवाज योजनेतील घरकुलास निधी दिला जात नाही, सोबतच पालिकेच्या रुग्णालयात उपचाराची तत्परता दाखवली जात नाही असे आरोप या दोघांचे होते.

प्रशासनाचा वेळकाढूपणा निराकरण करण्याची पद्धत  पुन्हा एकदा चव्हाट्यावर

 प्रशासनाचा वेळकाढूपणा आणि समस्यांचं निराकरण करण्याची पद्धत यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. आता या घटनेनंतर पालिका आयुक्तांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच हे प्रकरण पुढे वाढू नये म्हणून या दोघांना ही समज देऊन त्यांना घरी सोडून देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी मला मारहाण केल्याचा आरोप  दोघांनी केली आहे. आज तर आम्ही गाडीची पुढची काच फोडली मागण्या मान्य झाल्या नाही तर गाडी जाळून टाकू, असा इशारा देखील त्या दोघांनी दिला आहे. 

हे ही वाचा :

Pune Crime News: दादागिरी म्हणा किंवा मुजोरी! पुण्यात पेट्रोल भरण्यावरून दोघांनी केली तरुणाला मारहाण, Video Viral

                                  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident: नाशिकच्या भीषण अपघातात पुण्याच्या आयटी कंपनीतील एकटा विक्रांत कसा वाचला? आक्रित घडण्यापूर्वी मृत्यू समोर दिसला
नाशिकच्या भीषण अपघातापूर्वी विक्रांतला मृत्यू समोर दिसला, पण मित्रांनी ऐकलं नाही, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget