एक्स्प्लोर
एकतर्फी प्रेमातून दहावीच्या विद्यार्थ्याला भोसकलं
दहावीत शिकणारा वेदांत आणि त्याची मैत्रीण वेदांतच्या घरी परीक्षेचा अभ्यास करत होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास अभ्यास करुन झाल्यावर वेदांत मैत्रिणीला घरी सोडायला गेला.

पिंपरी चिंचवड : पिंपरीमधील दहावीच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून वेदांत भोसलेची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
दहावीत शिकणारा वेदांत आणि त्याची मैत्रीण वेदांतच्या घरी परीक्षेचा अभ्यास करत होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास अभ्यास करुन झाल्यावर वेदांत मैत्रिणीला घरी सोडायला गेला. तिला सोडून परत येताना पूर्णानगर भागात वेदांतवर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला.
काही नागरिकांनी वेदांतला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पिंपरीत दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या
परंतु वेदांत सोडायला गेलेल्या मुलीवर आरोपीचं एकतर्फी प्रेम होतं. त्यातूनच वेदांतची चाकूने भोसकून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलावर हल्ला होण्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. सोमवारी सकाळी अकरावीतील रुपेश गायकवाडवर हल्ला झाला. रुपेशवर चक्क जैन महाविद्यालयातच हल्ला झाला होता.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
मुंबई
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















