एक्स्प्लोर
बलात्काराचा कांगावा, पिंपरीत 'क्राईम पेट्रोल'फेम अभिनेत्रीला बेड्या
पिंपरी चिंचवड : क्राईम पेट्रोल मध्ये पोलिसाची भूमिका करणारी अभिनेत्री प्रत्यक्षात स्वतःवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करायला आली. मात्र तिलाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पूजा जाधवच्या भोळ्याभाबड्या चेहऱ्यावर जाऊ नका. कारण यामागे एक कारस्थानी मेंदू आहे. भोसरी पोलिसांनी तिचा पर्दाफाश केला आहे.
पूजा जाधवनं काही दिवसांपूर्वी एका धनदांडग्याला आपल्या जाळ्यात ओढलं, त्याच्याशी लगट केली आणि त्यानंतर बलात्काराच्या आरोपाची धमकी देऊन पैसे उकळायला सुरुवात केली. संबंधित व्यक्तीनं पोलिस ठाणे गाठलं आणि पूजाचं बिंग फुटलं.
पूजा जाधवला यासाठी माया सावंत, रवींद्र सिरसाम आणि अन्य दोन महिलांचीही साथ असायची. ते दोघे सामाजिक कार्यकर्ते असल्याचं भासवायचे आणि धमक्या द्यायचे.
पूजानं हेरलेलं हे काही पहिलं सावज नाही. त्यामुळे याआधीच्या गुन्ह्यांचाही तपास पोलिसांनी सुरु केला. बडे ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल मालक आणि इंजिनियर्स अशी पूजाची हिटलिस्ट होती. त्यामुळे पूजानं तुम्हालाही गंडवलं असेल, तर तातडीनं भोसरी पोलिसांना गाठून तक्रार द्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement