एक्स्प्लोर

Pahalgam Attack Sharad Pawar: संतोष जगदाळेंची पत्नी शरद पवारांना म्हणाली, दहशतवाद्यांचं डोकं फोडा, गोळी घालून रक्त-मांस बाहेर काढा अन् आम्हाला दाखवा

Pahalgam Attack: संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आज पहाटे पुण्यात आणण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दोघांचा मृत्यू. जगदाळेंच्या अंत्ययात्रेत 'पाकिस्तान जला दो'च्या घोषणा.

Pahalgam Attack Pune: काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात (Pune News) आणण्यात आले. पुणे विमानतळावरुन या दोघांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. (Pahalgam Terror Attack)

शरद पवार हे संतोष जगदाळे यांच्या अंत्यदर्शनासाठी कर्वे नगरमधील त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीशी संवाद साधला. यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नीने बैसरन व्हॅलीत दहशतवादी हल्ल्यावेळी घडलेला प्रकार शरद पवार यांना सांगितला. दुपारी साडेतीन चारच्या सुमारास हे घडलं. आमचा काश्मीरमध्ये फिरण्याचा पहिलाच दिवस होता. दहशतवाद्यांनी प्रतिकार करणाऱ्या घोडेवाल्यालाही मारलं. तो पर्यटकांना मारु नका, असे सांगत होता. दहशतवाद्यांनी तोंडावर मास्क घातले होते. लोकांचे जीव धोक्यात घालणं, लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणं थांबलं पाहिजे. आज माझा नवरा माझ्यासोबत नाही. आमचा माणूस आमच्या डोळ्यांदेखत गेला. तिथूनची स्थानिक लोकं आणि लष्कराचे अधिकारीही आमच्यासाठी रडत होते, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.

संतोष जगदाळेंच्या डोक्यात गोळी, कुटुंबीयांना चेहराही पाहता आला नाही

संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. मी कालपासून माझ्या नवऱ्याचा चेहराही बघू शकली नाही. काश्मीरमध्ये असताना आम्हाला मृतदेहाचा चेहरा बघता आला नाही, इथेही त्यांचा चेहरा उघडू दिला जात नाहीये. दहशतवाद्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळी घातली. आमच्यासाठी काहीतरी करा. त्या दहशतवाद्यांना शोधा आणि मारा. दहशतवाद्यांनी आमच्या लोकांच्या डोक्यात गोळी घालून मांस बाहेर काढलं, रक्त काढलं, तसंच त्यांच्यासोबत करा आणि दहशतवाद्यांचे मृतदेह आम्हाला दाखवा. दहशतवाद्यांनी लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातल्या. तेव्हा लहान मुलं रडत होती. तिकडून खाली उतरताना आम्ही चिखलात पडलो. त्यामुळे मला पायांवर उभंही राहता येत नाही, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे- 

1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

आणखी वाचा

काश्मीरला फिरायला जातोय, लवकर येईन! संतोष जगदाळे आईला शेवटचं भेटले; मृतदेह पाहून पत्नी धाय मोकलून रडली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Embed widget