एक्स्प्लोर

Pahalgam attack Pune Tourists: काश्मीरला फिरायला जातोय, लवकर येईन! संतोष जगदाळे आईला शेवटचं भेटले; मृतदेह पाहून पत्नी धाय मोकलून रडली

Pahalgam attack news: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2, डोंबिवलीतील तीन आणि पनवेलमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज डोंबिवली बंद

Kashmir Pahalgam terror attack: काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे (kaustubh ganbote) यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. पहाटेच्या सुमारास जगदाळे (Santosh Jagdale) आणि गणबोटे यांचे मृतदेह पुणे विमानतळावर आणण्यात आले. यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. (Kashmir Attack News)

संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृ्द्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटले होते. काश्मीरला फिरायला जातोय, लवकर येईन, असे त्यांनी आईला सांगितले होते. मात्र, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केल्याने जगदाळे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. संतोष जगदाळे यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला तेव्हा त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. संतोष जगदाळे यांची पत्नी धाय मोकलून रडत होती. 

कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले आहेत. कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांचा फसरणाचा व्यवसाय होता. त्यामुळे हे कुटुंब या परिसरात प्रसिद्ध आहे. पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या होत्या..  मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित. दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक  एअरपोर्टवर आले होते. गणबोटे यांच्या पत्नी , मुलगा आणि इतर नातेवाईक दुसऱ्या विमानाने पुणे एअरपोर्टला पोहचले आहेत. यानंतर ते आपल्या निवासस्थानी गेले. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मित्र होते. त्यामुळे हे दोन्ही कुटुंबीय एकत्रच काश्मीर फिरायला गेले होते. मात्र, या दोन्ही कुटुंबातील पुरुषांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमावावा लागला.

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे- 

1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

आणखी वाचा

पर्यटकांना वाचवण्यासाठी सय्यद आदिल छातीचा कोट करुन उभा राहिला, दहशतवाद्यांनी त्यालाही गोळ्या घातल्या!

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget