एक्स्प्लोर
पुण्यातील अडीच वर्षीय चिमुरडीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक
पुण्यातल्या धायरी परिसरात अडीच वर्षाच्या मुलीचं अपहरण, बलात्कार आणि खून प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यातल्या धायरी परिसरात अडीच वर्षाच्या मुलीचं अपहरण, बलात्कार आणि खून प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. सिंहगड पोलिसांनी साताऱ्यातून ही अटक केली.
रविवारी पुण्यातील धायरीमध्ये श्रुती विजय शिवगणे या चिमुरडीचा राहत्या घराजवळ मृतदेह सापडला. शनिवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास तिचं अपहरण करण्यात आलं होतं.
शवविच्छेदनानंतर या चिमुरडीवर लौंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस तपास करत होते. पोलिसांच्या तपासात रंगकाम करणार्या एका विकृताने हा घृणास्पद प्रकार केल्याचे उघडकीस आलं.
याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, आकाश पारगी असं या विकृताचं नाव आहे.
संबंधित बातम्या
पुण्यात अडीच वर्षीय चिमुरडीची हत्या, लैंगिक अत्याचाराचा संशय
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















