एक्स्प्लोर

पुण्यातील कोरोनाबाधिताला ओमायक्रॉन नाही, पण आढळला 'हा' व्हेरियंट

Omicron variant : पुण्यातील कोरोनाबाधिताला ओमायक्रॉनची लागण नसल्याचे समोर आले. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालात या बाधिताला वेगळ्या व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले.

Omicron variant case in Maharashtra :  महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा (Omicron) पहिला बाधित आढळल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. आफ्रिकन देशातून आलेल्या डोंबिवलीतील एका व्यक्तीला ओमायक्रॉनच्या संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले. तर, दुसरीकडे पुण्यातील 60 वर्षीय संशियत बाधितामध्ये ओमायक्रॉन नव्हे तर इतर व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

आफ्रिकन देश झांबियातून पुण्यात आलेल्या 60 वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताच्या जीनोम सिक्वेसिंगचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून आरोग्य विभागाला देण्यात आला. या रुग्णामध्ये डेल्टा सबलिनिएज हा विषाणू आढळून आला आहे. या कोरोनाबाधिताला ओमायक्रॉनची लागण नसल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. पुण्यात मागील वर्षी दुबईतून आलेल्या एका दाम्पत्याला कोविडची लागण झाली होती. हे राज्यातील पहिलेच प्रकरण होते. 

मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील स्थानिक पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. चार डिसेंबर रोजी सकाळपर्यंत मुंबई विमानतळावर हाय रिस्क देशातून आलेल्या 3839 प्रवाशांची आर.टी.पी.सी.आर तपासणी करण्यात आली. तर इतर देशांमधून आलेल्या 344 प्रवाशांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

आरोग्य विभागाचे आवाहन 

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड प्रोटोकॉल नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.  नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे, त्याशिवाय मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास माहिती द्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
Pune News : ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Embed widget