OBC Reservation Pune: कोणत्याही पक्षाने ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचं श्रेय घेऊ नये; ओबीसीच्या नेत्यांचं मत
OBC Reservationमची लढाई सुप्रीम कोर्टासोबत होती .आमची मुळ जनगणना झाली पाहिजे त्याशिवाय लोकसंख्या समजू शकणार नाही. कोणत्याही पक्षाने या निर्णयाचं क्षेय घेऊ नये, असं मत नेत्यांनी व्यक्त केलं आहे.
OBC Reservation Pune: ओबीसी आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसीच्या नेत्यांनी पुण्यात जल्लोष केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुका वंचित राहिल्या होत्या. ओबीसी आरक्षण नसल्याने आमचं राजकीय भविष्य संपणार आहे, असं वाटत होतं. आम्हाला न्याय देण्याचं काम आज सुप्रीम कोर्टाने केलं आहे. आमची लढाई सुप्रीम कोर्टासोबत होती आणि ही लढाई आम्ही जिंकलो आहोत. आमची मुळ जनगणना झाली पाहिजे त्याशिवाय आमची लोकसंख्या समजू शकणार नाही. कोणत्याही पक्षाने या निर्णयाचं क्षेय घेऊ नये, असं मत ओबीसीच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे.
सुप्रिम कोर्टाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली असून येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर कराव्यात असेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता ओबीसींना 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळणार आहे. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे.
ओबीसींना जे पंचायत राज मधलं आरक्षण आहे हे सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण आहे. जे मंडळ आयोगाच्या माध्यमातून 73 व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आरक्षण आहे. त्या आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत, असं म्हणत पुण्यातील मागास वर्ग आयोगाने जल्लोष साजरा केला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, सुप्रीम कोर्टानं आज बांठिया अहवाल मान्य केला असून राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिले आहे. दोन आठवड्यात उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोटिफाय करण्याचे सुप्रीम कोर्टानेआदेश दिले आहेत. त्यामुळे बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात स्थगित झालेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.