एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'गोल्डन अवर्स', अवजड वाहनांना बंदी

रायगडः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांच्या प्रवेशासाठी आज काही काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. एक्स्प्रेस वेवर सध्या वीकेंड आणि सणासुदीच्या काळात गोल्डन अवर्स लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आज सकाळी 8 पासून 12 वाजेपर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडीची समस्या टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवी कल्पना आणली आहे. सुट्ट्या आणि वीकेंडला एक्स्प्रेस वेवर ‘गोल्डन अवर्स’ लागू करण्यात येत आहे. यामध्ये अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. एक्स्प्रेस वेवर आज खालापूरजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र यामुळे पुण्याकडे जाताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फायदा होत आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















