Nilesh Lanke : कुख्यात गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार, पुण्यात भेट
Nilesh Lanke Meet Gaja Marane : अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली.

Nilesh Lanke Meet Gaja Marane : अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. निलेश लंके सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, त्यांनी गुरुवारी गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंची ही भेट वादात पडण्याची शक्यता आहे.
खासदार निलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगण्याची शक्याता आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता.
अमोल मिटकरी काय म्हणाले ?
हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता... आता तुतारी गटाचे शालीन वक्ते कुठे दबले आहेत. ज्यावेळी पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेतली, त्यावेळी गदारोळ माजवला होता. त्यावेळी आजित पवारांनी चूक झाल्याचं मान्य केले होते. भेटायला नको होतं, असं दादांनी सांगितलं होतं.
आज निलेश लंके सन्मानाने सक्तार स्वीकारत आहेत. बारामती अथवा अहमदनगर लोकसभामध्ये ज्या घडामोडी घडल्या, गुंडाचा वापर झाला, यामध्ये गजा मारणेचा सपोर्ट होता का ? हे तपासलं पाहिजे.. आम्ही सहज भेटलो तर रान उठवले जाते, असे निलेश लंके म्हणाले.
निलेश लंके अथवा तुतारी गटाकडून यावर काय स्पष्टीकरण काय देतात हे पाहावं लागेल. गजा मारणे कोण आहे अख्या महाराष्ट्रला माहित आहे. या सगळ्या घडामोडीवर काय स्पष्टीकरण देतात हे औत्सुक्याचं ठरेल, असे अमोल मिटकरी म्हणाले.
विद्या चव्हाण काय म्हणाल्या?
गजा मारणे याची भेट घेणं चुकीचेच आहे. निलेश लंके यांनी त्यांची भेट का घेतली? याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करेन. कोणताही लोकप्रतिनिधी असो गुन्हेगारीचा सत्कार स्वीकारणं चुकीचं आहे. हे त्यांनी का केले? हे मी त्यांना विचारेल. त्यांच्याकडून ही चूक कशी झाली? याबाबत मी विचारेन.
गजा मारणे कुख्यात गुंड, 3 वर्ष येरवडा कारागृहात
अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणेला अटक झाली होती. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
Before You Go
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?





















