एक्स्प्लोर
फलक लावणारा पिंपरी चिंचवडमधील 'तो' प्रियकर अखेर सापडला
प्रियकराने प्रेयसीला माफी मागण्यासाठीच असे फलक लावल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे. हा प्रताप करणाऱ्याचे निलेश खेडेकर असं नाव असून तो पुण्यात राहणारा आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील 'त्या' पाट्यांमागील गूढ अखेर उकलले आहे. प्रियकराने प्रेयसीला माफी मागण्यासाठीच असे फलक लावल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे. हा प्रताप करणाऱ्याचे निलेश खेडेकर असं नाव असून तो पुण्यात राहणारा आहे.
निलेश खेडेकर राजकीय नेत्याचा पाहुणा असल्याची माहितीही समोर येतेय. निलेशने त्याचा मित्र आदित्य शिंदेला हे फ्लेक्स लावायला सांगितले आणि त्याने ही एका रात्रीत 'शिवडे, आय एम सॉरी' अशा आशयाच्या पाट्या झळकवल्या. बरं हे एक दोन नव्हे तर बहात्तर हजाराचे तब्बल 300 फ्लेक्स छापून घेतले होते.
निलेशची 'शिवडे' ही पिंपळे सौदागर मध्ये राहणारी असल्याने, पिंपळे सौदागर ते वाकडच्या भुजबळ चौक मार्गावर या मनधरणीच्या पाट्या लावल्यात. या पाट्या अनधिकृत असल्याने प्रसिद्धीचा खर्च समजू शकला नाही. पण जाहिरातीचा खर्च हा पाच रुपये प्रति चौरस फूट आकारला जातो, त्यामुळे हा माफीनामा लाखोंच्या घरात नक्कीच गेला असावा.
वाकड पोलिसांनी महापालिका आणि जाहिरातदारांकडे चौकशी केल्यानंतर हा प्रताप समोर आला असून शहराचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी उद्या गुन्हा दाखल केला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement