एक्स्प्लोर

Nilesh Ghaywal: कुख्यात गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरू; भारतात आणण्यासाठी मोठं पाऊल, इंटरपोलकडे मागितली मदत, ब्लू कॉर्नर नोटीस जारी

Nilesh Ghaywal: दि इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ॲार्गनायझेशन म्हणजेच ‘इंटरपोल’ या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीची अंतर्गत सहकार्य या तत्त्वावर यंत्रणेचे काम चालते.

पुणे: पुण्यातील गुंड निलेश घायवळ (nilesh ghaywal) विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस (blue corner notice) जारी करण्यात आली आहे. इंटरपोलने घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर"  (blue corner notice) नोटीस जारी केली आहे. पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्र व्यवहारानंतर नोटीस जारी करण्यात आली आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस  (blue corner notice) जारी केली जाते. घायवळचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांना इंटरपोलची (interpol) मदत घेणार आहे. दि इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ॲार्गनायझेशन म्हणजेच ‘इंटरपोल’ या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीची अंतर्गत सहकार्य या तत्त्वावर यंत्रणेचे काम चालते.  (blue corner notice) 

Nilesh Ghaywal: पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिलं

कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळचा शोध देखील पुणे पोलीस घेत आहेत. पण तो परदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिलं आहे. पुणे पोलिसांची ही मागणी मान्य करत आता इंटरपोल त्याच्या विरोधात 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्याचा शोध आता इंटरपोलकडून घायवळचा शोध घेतला जाणार आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते.

Nilesh Ghaywal: घायवळ बंधूंचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज

कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळविरोधात ब्लू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. तर त्याचा भाऊ सचिन घायवळवर कोथरूड गोळीबार प्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घायवळ बंधूंचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला असून लवकरच या अर्जावर सुनावणी होणार आहे. या टोळीविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

Nilesh Ghaywal: पासपोर्ट रद्द करण्याची मागणी

कोथरूडमध्ये तरुणावर गोळीबार केल्यानंतर परदेशात पळून केलेला कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक करायची असून, त्यासाठी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी पुणे पोलिसांनी विशेष 'मकोका' न्यायालयाकडे केली. पुणे पोलीस निलेश घायघोळचा पासपोर्ट रद्द करणार आहेत. पोलिस आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिली होती. पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांशी या विषयावर चर्चा केली. या चर्चेनंतर ही माहिती समोर आली आहे. तपासात असे उघड झाले आहे की, घायवळने बनावट कागदपत्रे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला होता. पासपोर्ट मिळवण्यासाठी घायघोळने 'गायवळ' असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली होती, असे या तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवणे हा गंभीर गुन्हा आहे. पुणे पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेतील त्रुटी समोर आल्या आहेत.  

Nilesh Ghaywal: नेमकं प्रकरण काय?

ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराला पुण्यातील कोथरूड परिसरामधील मुठेश्वर चौकात घडली होती, तक्रारदार मित्रांसमवेत गप्पा मारत असताना, घायवळ टोळीतील गुंड दुचाकीवरून जात होते. त्यांना जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणांवरून भांडणे झाली. त्यातून आरोपींनी धुमाळ यांना मारहाण केली. त्यापैकी एकाने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर काही वेळाने आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार केले. आम्ही या भागाचे भाई आहोत, असे म्हणून आरोपींनी दहशत माजवली, असे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घायवळ टोळीच्या सदस्यांसह टोळीच्या म्होरक्यावरती देखील मकोका अंतर्गत कारवाई केली. यादरम्यानच्या तपासात टोळीप्रमुख निलेश घायवळ फरार असून, तो परदेशात पळून गेला असल्याचं समोर आलं. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे. त्याच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Brazilian Model Video Rahul Gandhi:  Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Indian team to meet PM Modi : भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा म्हणजे राजकीय स्टंट - कोकाटे
Starlink in Maharashtra: 'दुर्गम भागात आता सॅटेलाइट इंटरनेट', सरकारचा मोठा करार
Pune Crime : भोंदू मांत्रिक Vedika Pandharpurkar चा 14 कोटींचा गंडा, उच्चशिक्षित कुटुंबाची फसवणूक
Mumbai Infra: विरार-उत्तन सागरी सेतू वाढवण बंदरापर्यंत वाढवणार, CM फडणवीसांच्या बैठकीत मोठा निर्णय
Real Estate Boom: 'दहा लाखांची जमीन कोटीला', Sambhajinagar मध्ये DMIC मुळे जमिनींना सोन्याचा भाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Brazilian Model Video Rahul Gandhi:  Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Indian team to meet PM Modi : भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
India Test Squad vs South Africa 2025: पंत, जडेजा, पडिक्कल, आकाश IN, शमीकडे दुर्लक्ष; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाकडून कोणा कोणाला संधी, A टू Z माहिती
पंत, जडेजा, पडिक्कल, आकाश IN, शमीकडे दुर्लक्ष; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाकडून कोणा कोणाला संधी, A टू Z माहिती
Gajkesari Rajyog 2025: देव दिवाळी होताच 3 राशींचं नशीब चमकलं! 10 नोव्हेंबरला पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, विवाह..राजासारखं जीवन..
देव दिवाळी होताच 3 राशींचं नशीब चमकलं! 10 नोव्हेंबरला पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, विवाह..राजासारखं जीवन..
Bollywood Actress Life Story: साबणाच्या जाहिरातीत दिसलेली दिग्गज दिग्दर्शकाची गोड गोडुली चिमुकली; 90च्या दशकातली सुपरस्टार, सध्या इंडस्ट्रीपासून दूर, ओळखलं का कोण?
साबणाच्या जाहिरातीत दिसलेली दिग्गज दिग्दर्शकाची गोड गोडुली चिमुकली; 90च्या दशकातली सुपरस्टार, सध्या इंडस्ट्रीपासून दूर, ओळखलं का कोण?
Gadchiroli News: निवासी वस्तीगृहाच्या आड धर्मांतरणाचे धडे?; ख्रिश्चन मिशनरी वस्तीगृहाच्या संस्था चालकांचा मनमानी कारभार, गडचिरोलीच्या नागेपल्ली येथील धक्कादायक प्रकार
निवासी वस्तीगृहाच्या आड धर्मांतरणाचे धडे?; ख्रिश्चन मिशनरी वस्तीगृहाच्या संस्था चालकांचा मनमानी कारभार, गडचिरोलीच्या नागेपल्ली येथील धक्कादायक प्रकार
Embed widget