एक्स्प्लोर
कात्रजच्या उद्यानात सिंहाची नवी जोडी, आजपासून पुणेकरांना दर्शन
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध कात्रज उद्यानात पुणेकरांना आजपासून सिंहाचं दर्शन होणार आहे. त्यामुळे आजपासून वाघासोबत सिंह उद्यानात पाहायला मिळणार आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयाच्यावतीने ही सिंहाच्या नर-मादीची जोडी देण्यात आली आहे.
कात्रज उद्यानातील या सिंहाच नाव तेजस, तर मादीचं नाव सूबी असं आहे. या जोडीचा जन्म 2010 चा आहे. गेल्या 7 वर्षात हे दोघेही प्राणीसंग्रहालयाच्या आवारात रमले आहेत. आता लवकरच ते पुणेकरांना पाहायला मिळतील. यांच्या महिन्याचा खाण्याचा खर्च 25 ते 30 हजार रुपये आहे. रोज 8 किलो मांस या जोडीला देण्यात येत आहे.
कात्रजच्या उद्यानात सध्या चारशेच्यावर प्राणी आहेत. त्यात आता सिहांचीही भर पडली आहे. विशेष म्हणजे राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील पाच विदेशी प्रजातीचे पक्षी सक्करबाग प्राणीसंग्रहलयास देण्यात आले आहेत. त्याबदल्यात ही नर मादी जोडी सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने कात्रजच्या प्राणीसंग्रहालयास दिली आहे.
संबंधित बातम्या :
पुणेरी आयडिया, प्राण्यांना उन्हापासून बचावासाठी कुलर !
तरुणाची चक्क वाघाच्या पिंजऱ्यात उडी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement