एक्स्प्लोर

पुण्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनेनंतर नीलम गोऱ्हे यांचा पोलिसांना आदेश; नेमकं काय म्हणाल्या?

पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.

पुणे : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. 

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्यावत करावे. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रभावशील प्रकाश झोताची आणि भोंग्यांची व्यवस्था करावी. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी. याबाबतची माहिती सुरक्षितेतेच्या दृष्टिने नागरिकांना होणे गरजेचे आहे. यासाठी पुरेशी प्रसिद्धी द्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.  

गेल्या काही वर्षात तात्काळ पैसा कमावण्याच्या मोहापाई गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. यांचेवर विविध प्रकारे वचक ठेवणे आवश्यक आहे. महिला दक्षता समित्यांच्या बैठकांमधून फलनिष्पती काय झाली, तक्रारींचा निपटारा कसा केला याबाबतचा कृती अहवाल दक्षता समितीमधील महिला सदस्यांना द्यावी.यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येवू शकते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक कक्ष, जात पंचायत निमुर्लन कक्ष, अंध श्रृद्धा निमुर्लन कक्ष  तसेच मानवी तस्करी संदर्भातील कक्ष स्थापन होणे आवश्यक आहे. 

काही ठिकाणी घरातील व्यक्तिंकडूनच महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होताना दिसत आहेत. अशा वेळी नातेवाईकांनी पुढे येवून पोलीसांकडे तक्रार देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारामध्ये शाळा, महाविद्यालयाच्या तसेच स्कुल बसचे वाहनचालक आणि वाहक यांची चारित्र्य पडताळणी होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये गांभीर्यपूर्वक 'बॅड टच गुड टच' याची कार्यशाळा आणि मार्गदर्शन व्हावे. शहरात  नवीन पोलीस ठाणे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टिने प्रयत्न सूरू आहेत. 

पोलीसांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाई संदर्भातील यशकथा प्रसारमाध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. यामुळे समाजातील नागरिकांचा कायद्यावरील विश्वास वाढण्यास मदत होईल. पुणे शहर व परिसरातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी पोलीस विभागाने सदैव तत्पर रहावे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध
Astrology : आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा,  मनोज जरांगे काय म्हणाले?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध
Astrology : आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Horoscope Today 14 October 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Embed widget