एक्स्प्लोर

पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अभाविप कार्यालयाच्या नामफलकाला काळं फासलं

जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाच्या नामफलकाला काळं फासलं आहे.

पुणे : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्लाचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ देशभरातील विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. काल (06 जानेवारी) मुंबईतल्या विद्यार्थ्यांनीदेखील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करुन आपण जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहोत, असा संदेश दिला. तसेच भ्याड हल्ल्याचा निषेध केला. पुण्यातही विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. कालपासून या आंदोलनांमध्ये विद्यार्थी संघटना अग्रस्थानी होत्या. परंतु आता यामध्ये विविधी राजकीय पक्षांनीदेखील उडी घेतली आहे.

आज (07 जानेवारी) पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाच्या नामफलकाला काळं फासलं. जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचललं आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामागे अभाविप असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच आंदोलन आझाद मैदानावर स्थलांतरित केलं होतं. आझाद मैदानावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी निषेध सुरुच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. दरम्यान, या ठिकाणी आंदोलनाला कुठलीही परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं.

गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची नसताना हे आंदोलन सुरू होते. तुम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण, या ठिकाणी नाही. त्यामुळे आंदोलन स्थलांतरित करण्याची विनंती पोलिसांकडून विद्यार्थी संघटनांना करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थी संघटनांनी याला नकार देत आंदोलन सुरुच ठेवले होते. परिणामी पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आझाद मैदानात स्थलांतरित केलं. तरीही काही विद्यार्थी गेट वे ऑफ इंडियाच्या आसपास जमा झाली होती. आता हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

रविवारच्या रात्री जेएनयूमध्ये काय घडलं? राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मास्कधारी गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशा घोष गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करतायेत. एक तोंडाला रुमाल बांधलेला गुंड मुलींना धमकावण्याच प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या.

पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये अभाविपच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन | ABP Majha

 50 जणांवर गुन्हा दाखल पण अद्याप एकालाही अटक नाही | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Embed widget