Ajit Pawar: 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याचं भर सभेत साकडं; अजित पवार म्हणाले, 'तुझ्याकडं परत...'
Ajit Pawar: अजित पवारांचं भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांनी अचानकपणे घोषणा देत हातात एक फलक घेतला. त्यावर दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना! असं लिहण्यात आलेलं होतं.
Ajit Pawar: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सध्या राज्याच्या काही भागात सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार (Ajit Pawar) राज्यभर दौरा करत आहेत. आज जनसंवाद यात्रा पुणे जिल्हायत आहे, सकाळी पिंपरी त्यानंतर मावळ अशा ठिकाणी आज ही यात्रा असणार आहे. आजच्या यात्रेच्या वेळी अजित पवारांचं भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांनी अचानकपणे घोषणा देत हातात एक फलक घेतला. त्यावर दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना! असं लिहण्यात आलेलं होतं. त्याच्या या फलकावरील मजकूर आणि घोषणानंतर अजित पवारांनी भाषण थांबवून तुझ्याशी मी नंतर बोलतो असं अजित पवारांनी यावेळी यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
जनसन्मान यात्रेच्या मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत असताना एक कार्यकर्ता उभा राहिला आणि हातात फ्लेक्स घेऊन, मोठ्यानं घोषणा देऊ लागला. दादा, ओ दादा परत या ना, आपल्या राष्ट्रवादीत. अजित दादांनी हा फ्लेक्स पाहिला अन कार्यकर्त्यांची ही तळमळ ऐकून घेतली. अरे बाबा मी तुझ्याशी नंतर बोलतो, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं. मग पोलिसांनी हा फ्लेक्स ताब्यात घेतला.
अरे बाबा मी तुझ्याशी नंतर बोलतो...
जनसन्मान यात्रेच्या मंचावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलतायेत. यावेळी एक निष्ठावंत कार्यकर्ता उभा राहिला आणि हातात फ्लेक्स घेऊन, मोठ्यानं आवाज देऊ लागला. दादा, ओ दादा परत या ना, आपल्या राष्ट्रवादीत. अजित दादांनी हा फ्लेक्स पाहिला अन कार्यकर्त्यांची ही तळमळ ऐकून घेतली. अरे बाबा मी तुझ्याशी नंतर बोलतो, असं भर भाषणात अजित दादा म्हणाले. मग पोलिसांनी हा फ्लेक्स ताब्यात घेतला.
अल्ला किंवा देवाच्या कृपेने नव्हे, नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात, दोनवरच थांबा
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. अल्ला किंवा देवाच्या कृपेने मुलं होत नाही तर नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात, त्यामुळे दोनवरच थांबा, असा प्रेमळ सल्ला अजित पवारांनी महिलांना दिला आहे. मावळच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना हे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सभा मंडपात एकच हशा पिकला . पुण्यातील मावळमध्ये जनसन्मान यात्रेत महिला मेळावा संपन्न झाला.
अजित पवार म्हणाले, माय- माऊलींनो वाईट वाटून घेऊ नका. मला सगळ्या जाती धर्माच्या महिलांना हात जोडून सांगायचे आहे. मुलं, बाळं होतात. देवाची कृपा, अल्लाची कृपा नसते . ही नवऱ्याची कृपा असते म्हणून मुलं बाळ होतात. त्यामुळे दोन अपत्यावर थांबा... माझ्या मावळात आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज आहे. लहान कुंटुब ठेवले तर या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल. त्या दोन मुलांचे चांगले संगोपन करता येईल. तसेच चांगले शिक्षण देता येईल.. तुम्हाला पण चांगले जीवन जगता येईल.
भूलथापांना बळी पडू नका : अजित पवार
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, दोन कोटी महिलांना पैसे देणार आहोत. बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. कोणी काहीही म्हणेल, आम्ही पैसे परत घेणार नाही. रक्षाबंधनाला भावाला राखी बांधणाऱ्या बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेतो का? अजिबात नाही. कोणी काहीही अफवा पसरवत आहे, तुम्हाला हे पैसे कायम भेटतील. पुढचं लाईट बिल येणार नाही अन् मागचं लाईट बिल भरायचं नाही. अनेक जण मला म्हणतात दादा गुलाबी रंगाचे जॅकेट घालताय, महिलांना आवडतं म्हणून का? हो, महिलांना आवडतं म्हणून घालतो. त्यात काही मी वेडंवाकडं केलं का? उगाच काहीही बोलायचं म्हणून बोलतात.
सुनील शेळकेंना मेळाव्यात बोलताना अश्रू अनावर
सुनील शेळकेंना या मेळाव्यात बोलताना अश्रू अनावर झाले. बारामतीची जनता लोकसभेत अनेक भूलथापांना बळी पडली. मावळची जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही. म्हणून सुनील तटकरेंनी सुनील शेळकेंच्या भाषणावेळी पाठ थोपटली. गेल्या निवडणुकीत मला मतदान देण्यासाठी तुम्ही जे जे केलं, ते मी कधीचं विसरू शकत नाही, असे सुनील शेळके म्हणाले.