एक्स्प्लोर

...म्हणून या सरकारला लाडकी बहीण आठवली; शरद पवार गटाचा 'गुलाबी'मय झालेल्या अजितदादांना खोचक शब्दात टोला

निर्लज्ज सरकारला महिला अद्याप समजल्या नाहीतच. सरकारला  वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी देखील टीका केली. 

पुणे : राज्यात  'माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024) योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.  सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सडकून टीका केली आहे. बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं , लाडकी बायको नसते तर लाडकी बहीणचं असते, असे म्हणत  जयंत पाटील (Jayant Patil)  यांचे विश्वासू असलेले विद्यमान ‘युवक’ प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी निशाणा साधला आहे.   अजित पवारांच्या 'जनसन्मान यात्रे'नंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू झालीये. या यात्रेची पहिली सभा जुन्नरच्या लेण्याद्रीत झाली. या सभेत सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधला आहे.

मेहबूब शेख म्हणाले, वीस वर्षे दूध पाजणाऱ्या पवार साहेबांना या नागांनी डसले आहे.  स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांनी जे पेरलं ते का उगवलं नाही. आता ते लोक (अतुल बेनके) आपल्याकडे हेलपाटे मारत आहेत. त्यांना परतीचे डोहाळे लागले आहेत. पण जे लोकसभेआधी आले त्यांचं स्वागत केलं आहेच. पण जे उरलेत ते 'अली बाबा चाळीस चोर' आहेत. आज नागपंचमी आहे, आज नागांना दूध पाजले जाते. पण पवार साहेबांनी ज्या नागांना गेली वीस वर्षे दूध पाजले, त्या नागांनी फणा काढला अन् दूध पाजणाऱ्या पवार साहेबांना ते डसले.बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं आहे. लाडकी बायको नसते तर लाडकी बहीणचं असते. मग या सरकारला लाडकी बहीण आठवली.

सरकारला  वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले:  रोहिणी खडसे

लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन् पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवाय. आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे? तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. त्यामुळं यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच. सरकारला  वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी देखील टीका केली. 

सरकारची लाडकी खुर्ची योजना सुरू : अमोल कोल्हे

तर खासदर अमोल कोल्हे म्हणाले, लाडकी खुर्ची योजना सुरू आहे.  या लाडक्या खुर्चीसाठी वाट्टेल तितकी लोटांगणं घालण्याची तयारी या महायुतीने ठेवली आहे. यासाठी दिल्ली दरबारी दौरे सुरु आहेत. त्यामुळं आता आपल्याला स्वाभिमान जागवणारे सरकार आपल्याला राज्यात आणायचं आहे. त्यासाठी ही 'शिवस्वराज्य यात्रा' आपण काढतो. 

हे ही वाचा :

'अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख...', लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांचं विरोधकांना रोखठोक उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Embed widget