Supriya Sule And Nitin gadkari News: सुप्रिया सुळेंनी पुणेकरांसाठी नितीन गडकरींकडे केली महत्वाची मागणी, म्हणाल्या...
पुण्यातील महामार्गावर वाकड ते नर्हे या मार्गावर साऊंडप्रुफ वॉल/बॅरियर उभारावेत, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी पुणेकरांसाठी नितीन गडकरींकडे केली आहे.
Supriya Sule And Nitin gadkari News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पुणेकरांच्या वाहतुक समस्येवर भाष्य केलं आहे आणि त्या समस्येचं निराकरण करण्याचीही मागणी केली आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या वाहतुकीमुळे ध्वनीप्रदुषण होते. या प्रदुषणाचा अनेक नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे नागरिकांना या त्रासापासून मुक्त करण्यासाठी पुण्यातील महामार्गावर वाकड ते नर्हे या मार्गावर साऊंडप्रुफ वॉल/बॅरियर उभारावेत, अशी मागणी पुण्यातील अनेक संस्थांकडून होत आहे. यांच्या ध्वनीप्रदुषणाच्या प्रश्नाकडे किंवा त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक पत्र ट्विट करत याबाबत माहिती दिली.
पुण्यातील चांदणी चौक या परिसरातून अनेक महामार्गाकडे रस्ता जातो. त्यामुळे या चौकात कायम वाहतुक कोंडी होते. अनेक पुणेकरांना रोज या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याची गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुणेकरांची ही समस्या सोडवण्यात यावी आणि मंत्री नितीन गडकरी आणि NHAI प्राधिकरण याबाबत चौकशी करावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे.
मेट्रो आणि उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतुक कोंडी
चांदणी चौकात मेट्रो आणि उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. पुण्यात ज्या परिसरात मेट्रो किंवा उड्डाणपुलाचं काम सुरु आहे त्या परिसरात वाहतुक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच वाहतुक कोंडीचा सामान्य नागरिकांना रोज सामना करावा लागतो. त्यासोबत नागरिकांचा वेळही वाया जातो. पुणे मेट्रोमुळे वाहतुक कोंंडी सुटणार, असं आश्वासन अनेक बड्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा दिली. मात्र पुणकेरांची वाहतुक कोंडीपासून सुटका कधी होणार यावर प्रश्नचिन्हच आहे. यासोबतच पुण्यातील नवले पुलावर अपघाताचं सत्र सुरु असतं. दर दोन महिन्यात एक मोठा अपघात या पुलावर होतो. या पुलाकडेसुद्धा प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
