एक्स्प्लोर

Ajit Pawar NCP: पक्षाने आम्हाला को#* तर आम्हीदेखील पक्षाला को#*शिवाय राहणार नाही, पुण्यातील नेत्याचा अजितदादांना गर्भित इशारा

Ajit Pawar NCP: जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

इंदापूर: पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही देखील कोलल्याशिवाय राहणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांचा इंदापुरातून गर्भित इशारा दिला आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून इंदापुरात राजकारण तापलं असल्याचं दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कृषिमंत्री भरणे यांना इशारा थेट दिला आहे. इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून इंदापुरात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.

Ajit Pawar NCP: गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली

जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी इंदापूर शहरातील गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ. जर पक्षाने आमचं ऐकलं, योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहोत, पक्षाने जर आम्हाला कोलल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशाराच इंदापुरातून जिल्हाध्यक्ष गारटकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह  इंदापूरचे आमदार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे.

Ajit Pawar NCP: माझी सगळ्यांशी बोलणी सुरू आहे

आपण आपली ताकद आणि उद्या आपल्या बरोबर येणाऱ्या लोकांची ताकद एकत्र मिसळली तर या शहरांमध्ये एकतर्फी निवडणूक होऊन जाईल. एवढी मी तुम्हाला खात्री देतो. या दृष्टीने माझी सगळ्यांशी बोलणी सुरू आहे. त्या पद्धतीने लोक आपल्या विचाराला आपल्याला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांनी पाठिंबा देत असताना त्यांचा काय म्हणणं आहे ते मला फक्त ऐकून घ्यायचं आहे. ते मी ऐकून घेतो आणि त्यामध्ये सन्मानाने मार्ग काढून सगळे मिळून एकत्रित पॅनल उभा करूयात. हे त्यांनाही मी सांगितलं आहे. याआधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे. पक्षाने जर आमचा ऐकलं पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहे. जर पक्षाने आम्हाला कोललं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार आहे. हे सांगून टाकलं आहे माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा उद्याच्या शेवटच्या तारखेला फॉर्म भरण्याच्या दोन दिवस आधी त्यादिवशी पर्यंत त्या गोष्टीची वाट बघू. त्यानंतर मी निर्णय घेईल, पक्ष आपल्या निर्णयाच्या विरोधात जर काही करत असेल, तर मग मी माझी नैतिकता ओळखतो मला ती सांभाळायची माहिती आहे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देईल असंही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर त्यांनी म्हटलं आहे

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Petrol and Diesel in Maharashtra: परभणी, बुलढाणा अन् वाशिममध्ये पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई, पंपावर ग्राहकांची तुफान हाणामारी; मनसेच्या पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
परभणी, बुलढाणा अन् वाशिममध्ये पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई, पंपावर ग्राहकांची तुफान हाणामारी; मनसेच्या पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Pune Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; आरोपी विरोधात 1100 पानाचं आरोपपत्र न्यायालयात दाखल, 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब, अहवालात नेमकं काय?
पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; आरोपी विरोधात 1100 पानाचं आरोपपत्र न्यायालयात दाखल, 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब, अहवालात नेमकं काय?
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
Rohit Pawar : पार्थ पवार, सुनेत्राकाकींशी 'त्या' विषयावर चर्चा करायची इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 
पार्थ पवार, सुनेत्राकाकींशी 'त्या' विषयावर चर्चा करायची इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Ankita Walawalkar Cannes: 'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
Parth Pawar and Devendra Fadnavis: राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग , पार्थ पवार अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग , पार्थ पवार अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
Embed widget