एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचा वर्धापनदिन, जेलबाहेर आल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच मंचावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल यात्रेचाही समारोप होणार आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल यात्रेचाही समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आजच्या या कार्यक्रमात छगन भुजबळही बोलणार असल्याची माहिती आहे. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 20 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यामुळे वर्धापनदिनाचं औचित्य साधत आज राज्यभर काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेचाही समारोप कऱण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांच्यासह महत्त्वाचे नेते आजच्या कार्य़क्रमाला हजेरी लावणार आहेत. दरम्यान महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकऱणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांची काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटका झाली आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर आज पहिल्यांदाच ते जाहीर कार्य़क्रमात बोलणार आहेत. त्यामुळे भुजबळ काय बोलतात याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे. LIVE UPDATES : LIVETV : ठोकर लागली की ती तुटते, मात्र ठोकर लागल्यानंतर येते ती कामयाबी : छगन भुजबळ LIVETV : बचेंगे तो और भी लढेंगे, हम बचेंगे भी और लढेंगे भी : छगन भुजबळ LIVETV : मी जेलमध्ये असताना आठवड्यातून तीनदा माझे घरचे साहेबांच्या घरी जायचे : छगन भुजबळ LIVETV : सर्व पक्ष, जाती-धर्मांना सोबत घेऊन गेलं पाहिजे : छगन भुजबळ LIVETV : 17 टक्के आरक्षण उरलंय आणि 400 जाती आहेत, कसं द्यायचं आरक्षण? : छगन भुजबळ LIVETV : मराठा समाजाने समजून घ्यावं, तो मोठा भाऊ आहे : छगन भुजबळ LIVETV : माझं पूर्ण समर्थन, मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, कुणीही सांगावं मी विरोध केला : छगन भुजबळ LIVETV : इंदिराजींची आणीबाणी घटनेवर आधारीत होती, आताची आणीबाणी मात्र भीषण आहे : छगन भुजबळ LIVETV : आपण आत्मसंतुष्ट नाही, चार वर्षात त्यांनी खूप दिलं : छगन भुजबळ LIVETV : शेतकऱ्यावर कमी भावासाठी जबरदस्ती, शेतकरी रडताएत, पाकिस्तानची साखप आता यांना गोड लागते : छगन भुजबळ LIVETV : आता गावात आत्महत्या होत नाही, मंत्रालयासमोर होतात : छगन भुजबळ LIVETV : केवढे चांगले दिवस, शेतकरी आत्महत्या करत नाही, हमीभाव मिळतोय : छगन भुजबळ LIVETV : चार किमी गंगा दाखवा जी तुम्ही स्वच्छ केली, ते सांगतील सुद्धा, त्यांनी खूप काम केलं आहे : छगन भुजबळ LIVETV : देशात चार स्मार्ट सिटी दाखवा, चार जिल्हे दाखवा जे पूर्ण प्रकाशमान आहेत, ज्यांच्यातील जनधन खाती जीवंत आहेत : छगन भुजबळ LIVETV : स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियानंतर रुईनअप इंडिया येतंय असं वाटत आहे : छगन भुजबळ LIVETV : गेल्या चार वर्षात देशात एकही अत्याचार झाला नाही, सर्वत्र शांतता, नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला : छगन भुजबळ LIVETV : सर्वांना नोकरी, घराघरात स्वस्त गॅस, केंद्र सरकारचे आभार : छगन भुजबळ LIVETV : घोड्याला भाव आला, गाड्या सोडून लोकं घोडे घ्यायला लागले, पेट्रोल परवडत नाही : छगन भुजबळ LIVETV : बाहेर आल्यानंतर खायचं काय? पाहिलं तर सर्व कुटुंबाच्या खात्यात 15-15 लाख जमा : छगन भुजबळ LIVETV : मै जिंदगी का साथ निभाता चला गया, .... बरबादीयोंका जश्न मनाता चला गया, जो हो गया उसे भुलाता चला गया : छगन भुजबळ LIVETV : म्हणे 100 कोटी रुपयांचा माझा बंगला आहे, सगळं अटॅच केलं, मात्र लोकांचं प्रेम अटॅच नाही करु शकले : छगन भुजबळ LIVETV : म्हैस होती पाच फुटांची गाभण, आणि रेडकू निघालं 15 फुटांचं अशी परिस्थिती : छगन भुजबळ LIVETV : महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराची नेमणूक मी केली नाही, त्यावेळी मंत्रीही नव्हतो : छगन भुजबळ LIVETV : महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा कंत्राटदारही छगन भुजबळने नेमला नाही : छगन भुजबळ LIVETV : वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही : छगन भुजबळ LIVETV : जिथे- जिथे छगन भुजबळ नाव तिथे धाडी टाकल्या : छगन भुजबळ LIVETV : कुणी वाघ म्हणतंय, कुणी माकड म्हणतंय, बंदर उछलना तो छोडेगा नही : छगन भुजबळ LIVETV : हा राष्ट्रवादीचा मंच, त्यामुळे मनापासून बोलणार : छगन भुजबळ LIVETV : माझ्यासाठी सर्व पक्षांचे नेते पाठिशी राहिले, सर्वांचेच आभार : छगन भुजबळ LIVETV : माझ्या सुटकेसाठी मोर्चे काढण्यात आले, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानतो : छगन भुजबळ LIVETV : न्यायदेवतेवर माझा विश्वास होता, आहे आणि राहणार, लवकरच निर्दोषत्व सिद्ध करणार : छगन भुजबळ LIVETV : अडीच-तीन वर्षांनंतर तुमच्यासमोर बोलायला उभा आहे, सवय आहे की गेली? : छगन भुजबळ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'

व्हिडीओ

Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Embed widget