NIA च्या पथकाची पुण्यात धडक कारवाई, 19 वर्षीय विद्यार्थाला घेतलं ताब्यात, चौकशी सुरु
पुणे : एनआयएने आज पुण्यात 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलेय. मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा पुण्यातील अरिहंत काँलेजमध्ये शिकत आहे. त्याचे नाव शापवान शेख असे आहे. एएनआयच्या पथकाकडून त्या तरुणाची चौकशी सुरु आहे.
पुणे : मागील काही दिवसांपासून एनआयए (National Investigation Agency) पथकाने देशभरात कारवाईचा धडाका लावलाय. आजही देशभरात विविध ठिकाणी एनआयएने (NIA) छापेमारी केली. एनआयएने आज पुण्यात (NIA Pune) 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलेय. मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा पुण्यातील अरिहंत कॉलेजमध्ये (pune Arihant College) शिकत आहे. त्याचे नाव साफवान शेख असे आहे. एएनआयच्या पथकाकडून त्या तरुणाची चौकशी सुरु आहे. त्या तरुणाकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायस जप्त करण्यात आलेय. बंगळुरु येथील इसिस मॉड्यूलच्या टेलिग्रामध्ये हा मुलगा सहभागी होता, त्यामुळे त्याची चौकशी सुरु आहे.
आज पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या तरुणाकडे NIA ने चौकशी केलीय. त्याचबरोबर एन.आय.ए.च्या गुन्ह्यात आधीपासून आरोपी असलेल्याच्या घरी जाऊन देखील चौकश करण्यात आली आहे. NIA च्या बंगळुरु मधील पथकाने आज पुण्यात कारवाई केलीय. पुण्यातील अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या 19 वर्षीय साफवान शेख याला ताब्यात घेण्यात आलेय. एनआयएकडून चौकशी करण्यात आली आहे. 19 वर्षीय तरुणाकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत. एएनआयला मिळालेल्या माहितीनुसार, साफवान हा बंगळुरु येथील इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम गृपमध्ये सहभागी होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी करण्यात येत आहे.
अमरावतीमध्ये 21 वर्षीय तरुण ताब्यात -
NIA ने आज अमरावतीमध्येही धडक कारवाई केली. एनआयएच्या पथकाने अचलपूर येथील अकबरी चौकातून 21 वर्षीय तरुणाला आज ताब्यात घेतले. सय्यद सहयाम सय्यद रहेमत असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. एनआयएने ताब्यात घेतलेला तरुण हा अचलपूर येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
NIA ने अचलपूरमधून ताब्यात घेतलेल्या युवकाची अमरावती येथील जोग क्रीडा संकुल मधील वसंत हॉल याठिकाणी चौकशी सुरू आहे. NIA टीम नी ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या घरून काही कागदपत्रे आणि लपटॉप आणल्याची माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, विद्यार्थी सोशल मीडिया, विशेषत: व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जिहादी संघटनांच्या संपर्कात होता. हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरून एनआयएचा पथक स्थानिक एटीएस आणि जिल्हा पोलिसांच्या पथकासह आज पहाटे 4 वाजता अचलपूरला पोहोचले होते.
एनआयएकडून 19 ठिकाणी शोध -
एनआयएकडून आज दक्षिण भारतातील 19 ठिकाणी शोध सुरू आहे. एनआयएने अत्यंत कट्टरतावादी जिहादी दहशतवादी गटाचा पर्दाफाश करून छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील अमरावती येथेही छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
National Investigation Agency (NIA) is conducting searches at 19 locations in South India by busting a highly radicalised Jihadi terror group pic.twitter.com/oYnsKJjnaW
— ANI (@ANI) December 18, 2023