Pune Metro Phase 2 : केंद्र सरकारचे तीन मोठे निर्णय, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी, 3626 कोटींच्या खर्चाला मान्यता
Union Cabinet Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आली.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विकास प्रकल्पांसंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 3626 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. झारखंडमधील एका प्रकल्पासाठी 5940 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तर आग्रा येथील आंतरराष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्रासाठी 111 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. सध्याचा वनाज-रामवाडी कॉरिडॉर हा पहिला टप्पा आहे. त्याचा विस्तार वनाज ते चांदणी चौक (कॉरिडॉर -2A) आणि रामवाडी ते वाघोली/ विठ्ठलवाडी (कॉरिडॉर-B) ला मंजुरी दिली.एलिवेटेड कॉरिडॉर 12.75 किलोमीटरचा असेल, यामध्ये 13 स्टेशन असतील.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत. मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यावर काय परिणाम होणार याची माहिती दिली आहे.
पाठपुराव्याला यश; पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 25, 2025
धन्यवाद, मोदी सरकार !
धन्यवाद, मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस
पुणे शहराच्या मेट्रो विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या आपल्या पाठपुराव्याला यश आले असून, पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखालील… pic.twitter.com/UNHCBupn5p
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये
वनाज–चांदणी चौक (कॉरिडॉर 2A) आणि रामवाडी–वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2B) हे दोन उन्नत मार्ग
नवीन मेट्रो मार्गांच्या माध्यमातून वनाज–रामवाडी मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार
मंजुरी मिळालेल्या या 12.75 किमी लांबीच्या मेट्रो मार्गावर 13 स्थानकं असणार
बावधन, कोथरूड, खराडी, वाघोलीसारख्या महत्त्वाच्या भागांना मेट्रोद्वारे जोडलं जाणार
नवे मार्ग जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावरून Line-1 (निगडी–कात्रज) आणि Line-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) शी जोडले जाणार
चांदणी चौक आणि वाघोली येथे आंतरशहर बससेवा मेट्रोशी जोडली जाणार
मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोची जोड मिळणार
पुण्यातील स्मार्ट आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्टचा पाया घातला जाणार आहे.
3626.24 कोटींचा हा प्रकल्प महा-मेट्रोमार्फत पुढील 4 वर्षांत पूर्ण करण्यात येणार
प्रकल्प IT हब्स, शैक्षणिक संस्था, निवासी व व्यावसायिक क्षेत्रांतील लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासासाठी सुरक्षित पर्याय
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा केलेला होता, त्याचबरोबर पुणे शहरातील आणखीन दोन नवीन मेट्रो मार्गांसाठी देखील डीपीआर करण्याची सूचना यामध्ये देण्यात आलेले आहे, त्यामुळे येत्या काळात पुण्यात मेट्रोचे जाळे आणखीन विस्तारणार आहे.या नव्या मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी तीन हजार 600 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.
























