एक्स्प्लोर

Ajit Pawar: 'माझा आवाज थोडा मोठा आहे, तुम्ही लगेच...', हिंजवडीच्या सरपंचाना झापल्याच्या घटनेनंतर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar: आज पहाटेच्या सुमारास अजित पवारांनी हिंजवडीतील पाहणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली, यावेळी त्यांनी हिंजवडीच्या सरपंचांना झापल्याचं समोर आलं होतं.

पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये असलेल्या अनेक समस्यांबाबत आधी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पहाटेच्या सुमारास पाहणी केली. यावेळी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये दिसून आले. त्याचबरोबर हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलं. त्याचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी अजित पवार म्हणाले, माझा आवाज थोडा मोठा आहे.
तुम्ही लगेच टीव्हीला दाखवता, अजित पवारांनी अमक्याला झापलं तमक्याला झापलं. मला सगळ्यांबद्दल आदर आहे. सगळे आम्हाला सहकार्य करतात, सगळ्यांचा आदर करुन आमचे सगळे सहकारी मदत करतात, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

माझा आवाज थोडा मोठा आहे. तुम्ही लगेच टीव्हीला दाखवता, अजित पवारांनी अमक्याला झापलं तमक्याला झापलं. मी काय कोणाला झापायला आलो नाही. सगळेजण आम्हाला सहकार्य करत आहेत. सर्वांचा आदर ठेवून आम्ही अधिकारी, त्यांच्या हाताखालचे सहकारी मदत करत आहेत, सर्वांच्या सहकार्यांने आम्ही सोबत पुढे काम करत आहोत, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

नेमकं काय प्रकरण?

आज पहाटेच्या सुमारास अजित पवारांनी हिंजवडीतील पाहणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली, सरकारी कामाच्या आड कोण येत असेल कर त्यांच्यावर 353 लावा अशा सूचनाही अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्या, त्यानंतर पाहणी करून निघत असताना हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर हे अजित पवार यांच्याशी बोलत असताना त्यांनी खडेबोल सुनावल्याचं दिसून आलं. त्यावरती आज माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, माझा थोडा आवाज मोठा आहे.
तुम्ही लगेच टीव्हीला दाखवता, अजित पवारांनी अमक्याला झापलं तमक्याला झापलं. मला सगळ्यांबद्दल आदर आहे.

सरपंचाना अजित पवार काय म्हणाले?

कामाची पाहणी करत असताच अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलं. ते सरपंच अजित पवारांशी बोलत असताना ते म्हणाले, अहो असू द्या हो असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो...आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललाय...माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर....बेंगलोरला हैदराबादला ...काय तुम्हाला पडलं नाही....कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथं, मला कळत नाही माझी माणसं नाहीत...हे केल्याशिवाय गत्यंतर नाही... असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर खडेबोल सुनावले आहेत.

कोणीही मध्ये आलं तर त्यावर 353 टाका

अजित पवारांनी पहाटेच घेतली अधिकाऱ्यांची शाळा घ्यायला सुरूवात केली. आपलं असं ठरलंय कामाच्यामध्ये कोणी आला तर त्यावर 353 दाखल करा.तो कोणीही असेल तरी करा.अजित पवार जरी मध्ये आला तरी 353 दाखल करायचा. बाकीचं कोणाचं काय ठेवायचंच नाही. 353 लावायचा कारण त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. नाही प्रत्येक जण माझं हे करा माझं ते करा असं करत राहिलं,आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MCA Elections: MCA निवडणुकीत राजकीय डावपेच, अध्यक्षपदासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी
Munde Legacy Row : 'भुजबळांनी मुंडे भाऊ-बहिणींमध्ये मिठाचा खड्डा टाकू नये', प्रकाश महाजनांचा सल्ला
VBA vs RSS : आरएसएसवर बंदीची मागणी, वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम
Voter List Fraud: 'बोगस वोटिंगचा बॉम्ब फोडणार', Aaditya Thackeray यांचा Election Commission ला थेट इशारा
Vote Scam : 'अवघ्या ८० रुपयांत मत विकले', Karnataka SIT तपासात समोर आले धक्कादायक रेट कार्ड!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
Aishwarya Sharma And Neil Bhatts Divorce Rumours: जी भिती होती तेच झालं? ऐश्वर्यानं एकटीनं साजरी केली दिवाळी; घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा जोर
जी भिती होती तेच झालं? ऐश्वर्यानं एकटीनं साजरी केली दिवाळी; घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा जोर
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Embed widget