एक्स्प्लोर

Aishwarya Sharma And Neil Bhatts Divorce Rumours: जी भिती होती तेच झालं? ऐश्वर्यानं एकटीनं साजरी केली दिवाळी; घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा जोर

Aishwarya Sharma And Neil Bhatts Divorce Rumours: एकट्यानं दिवाळी साजरी करत असतानाचे ऐश्वर्याच्या फोटोंमुळे घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. 

Aishwarya Sharma And Neil Bhatts Divorce Rumours: लोकप्रिय टेलिव्हिजन कपल ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) आणि नील भट्ट (Neil Bhatt) यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या (Aishwarya Sharma And Neil Bhatt Is Taking Divorce) बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ऐश्वर्यानं दिवाळीही एकटीनंच साजरी केली. तिनं दिवाळीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे चाहत्यांनी नीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पण, दोघांनीही अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पण, एकट्यानं दिवाळी साजरी करत असतानाचे ऐश्वर्याच्या फोटोंमुळे घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. 

ऐश्वर्या शर्माची सोशल मीडिया पोस्ट (Aishwarya Sharma Social Media Post)

ऐश्वर्या शर्मानं आपल्या इन्स्टाग्रामवर दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये ती एकटीच दिसतेय. तिनं सुंदर ट्रेडिशनल ड्रेस वेअर केलाय. या फोटोंसह ऐश्वर्यानं एक कॅप्शन लिहिलंय, त्यात म्हटलंय की, "Let’s sparkle brighter than the fireworks… Let the light of Diwali illuminate your life with love and prosperity..." 

ऐश्वर्यानं हे फोटो पोस्ट करताच, चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी ऐश्वर्याच्या सौंदर्याचं कौतुक केलं आणि तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अनेकांनी तिच्यासोबत नील न दिसल्यामुळे चिंता व्यक्त केली. काही युजर्सनी विचारलं, "नील कुठे आहे?" तर काहींनी कमेंट केलीय की, त्यांना या जोडप्याला एकत्र पाहून खूप आनंद झाला.

View this post on Instagram
 
A post shared by Aishwarya Sharma (@aisharma812)

काहींनी तर इतर युजर्सना उगाच कोणताही निष्कर्ष काढू नये, असं आवाहन केलं. तसेच, इतरांना आठवण करुन दिली की, या जोडप्यानं अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, इतरांनी शुभेच्छा पाठवल्या आणि ऐश्वर्या आणि नीलमध्ये सर्व काही ठीक होईल, अशी आशा व्यक्त केली.    

कधी, कशी झालेली ऐश्वर्या आणि नीलची पहिली भेट? (Aishwarya Sharma, Neil Bhatt First Meeting)

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांची भेट 'Ghum Hai Kisikey Pyaar Meiin' या शोच्या सेटवर झाली. ते प्रेमात पडले आणि त्यांनी डेटिंग सुरू केली. त्यांनी 2021 मध्ये लग्न केलं. त्यानंतर ते 'स्मार्ट जोडी' आणि 'बिग बॉस 17' सारख्या शोमध्ये एकत्र दिसले.

चाहत्यांना ऐश्वर्या आणि नील यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचं लक्षात आल्यानं सोशल मीडियावर घटस्फोटाच्या अफवा वाढल्या, पण नंतर त्यांनी पुन्हा एकमेकांना फॉलो करणं सुरू ठेवलं. शिवाय, नील भट्टला अलीकडेच एका मिस्ट्री वुमनसोबत पाहिलं गेलेलं, ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी जोर आला. या सर्वांमध्ये, या जोडप्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे एकत्र
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे एकत्र
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे एकत्र
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे एकत्र
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Solapur Crime: कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
Pune Prashant Jagtap: प्रशांत जगतापांच्या राजीनामा अस्त्राकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक
प्रशांत जगतापांच्या राजीनामा अस्त्राकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक
Nagarparishad Election Result 2025 Baramati: पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्राच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा
पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्राच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा
Embed widget