एक्स्प्लोर
या ट्रेनने मुंबई ते पुणे केवळ 20 मिनिटात!
राज्य सरकारने पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोरसाठी अमेरिकास्थित व्हर्जिन हायपरलूप कंपनीशी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (आशय पत्र) वर स्वाक्षरी केली आहे.

मुंबई : मुंबईहून पुणे गाठण्यासाठी रस्ता किंवा रेल्वेमार्गाने किमान तीन तास लागतातच. जवळपास दीडशे किलोमीटरचं हे अंतर भविष्यात अवघ्या 20 मिनिटांत कापता येणार आहे. राज्य सरकारने पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोरसाठी अमेरिकास्थित व्हर्जिन हायपरलूप कंपनीशी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (आशय पत्र) वर स्वाक्षरी केली आहे.
पहिला हायपरलूप मार्ग मध्य पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 फेब्रुवारीला नवी मुंबई विमानतळाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी असेल, अशी माहिती व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात बोलताना दिली.
मुंबई ते पुणे अंतर कापण्यासाठी रस्ते किंवा रेल्वे मार्गाने किमान तीन तासांचा कालावधी लागतो. मात्र पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोर प्रत्यक्षात अवतरल्यास हे अंतर भविष्यात अवघ्या 20 मिनिटांत पार करता येईल. या प्रकल्पाचं मूल्यांकन करण्यासाठी व्हर्जिन हायपरलूप वन (व्हीएचओ) सोबत राज्य सरकारने करार केला आहे. प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. रिचर्ड ब्रॅन्सन यांनी कॅलिफोर्नियात व्हर्जिन हायपरलूप कंपनीची स्थापना केली. हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम काय आहे? दोन शहरांना जोडणाऱ्या भव्य ट्यूब्स बांधल्या जातात. (एक मुंबईकडे जाणारी, तर पुण्याच्या दिशेने) ट्रेनप्रमाणे स्पेशल कम्पार्टमेंट एका दिशेने दुसरीकडे प्रवास करतात. ठराविक अंतराने असलेल्या मॅग्नेटिक अॅक्सलरेटर्समुळे हे कम्पार्टमेंट पुढे सरकत राहतील. कम्पार्टमेंट भोवती हवेचा कमी दाब तयार करुन वेग वाढवला जाईल. प्रवाशांची वाहतूक करताना त्यांचा वेग ताशी एक हजार किमी असेल, असं रिचर्ड ब्रॅन्सन यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात याच्या निम्म्या वेगाने प्रवास झाला, तरी दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ प्रचंड प्रमाणात वाचेल. मुंबईत पीक अवर्समधील ट्राफिक पाहता या वेळेत वांद्र्याहून सांताक्रुझ गाठायला जितका वेळ लागेल, तितकाच वेळ सांताक्रुझहून पुणे गाठायला लागू शकतो.New @Virgin @HyperloopOne in India could connect 26 million people, support 150 million passenger trips per year & help create a thriving, competitive megaregion https://t.co/IkYbfIs2yi pic.twitter.com/G4fh2WZ5TY
— Richard Branson (@richardbranson) February 18, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
