एक्स्प्लोर

Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट

Supriya Sule on Bopdev Ghat Incident: पुण्यातील बोपदेव घाटातून तरूणीचे अपहरण करून तिला येवलेवाडी परीसरात घेऊन जाऊन तिच्यावर गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार समोर आला आहे. या घटनेवर सुळेंनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे: पुण्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार, खून, गुन्हेगारी या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अशातच काल (गुरूवारी) दोन चिमुकल्या मुलींवर स्कुलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, या घटनेचा संताप नागरिक, पालक व्यक्त करत असतानाच शहर परिसरात पुन्हा एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली. पुण्यातील बोपदेव घाटातून तरूणीचे अपहरण करून तिला येवलेवाडी परीसरात घेऊन जाऊन तिच्यावर गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केल्याची माहिती आहे. या घटनेबाबत नागरिकांसह आता राजकीय नेते देखील संताप व्यक्त करताना दिसत आहेत. (Pune Crime News)

सुप्रिया सुळेंची संतापजनक पोस्ट

या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतापजनक पोस्ट लिहली आहे.  सोशल मिडिया एक्सवरती सुळेंनी पोस्ट लिहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये, "अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी", अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Pune Crime News)

नेमकं काय आहे प्रकरण?

मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी राजेखां करीम पठाण याच्यांसह तिघांना अटक केली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून आरोपी नराधम पसार झाले. त्यानंतर तरुणीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Harshvardhan Patil: पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : 'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Adiwasi MLA Mantralaya : मंत्रालयात आदिवासी आमदारांनी थेट जाळीवर उड्या घेतल्या, वातावरण तापलंHarshwardhan Patil Indapur : हर्षवर्धन म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश  करायचा का? कार्यकर्ते म्हणाले..TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Harshvardhan Patil: पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : 'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Embed widget