पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द; उदयनराजेंकडून आमंत्रितांना बैठक रद्दचा निरोप
उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने पुण्यात आयोजित करण्यात आलेली मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आली आहे. स्वतः उदयनराजेंकडून आमंत्रितांना तसा निरोप पाठवण्यात आला आहे.

पुणे : भाजप खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्त्वात आज पुण्यामध्ये मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु, ही परिषद आता रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी या परिषदेचं आयोजन केलं होतं. मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला याचिकाकर्ते, अभ्यासक, विधीतज्ज्ञांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते.
मराठा आरक्षण परिषद अचानक रद्द का करण्यात आली यासंदर्भातील कोणतंही कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून निरोप देण्यात आला की, आज होणारी मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आली आहे. आज दुपारी दोन वाजता या परिषदेचं आयोजन पुण्यातील रेसिडेन्सी क्लबमध्ये करण्यात आलं होतं. या परिषदेसाठी खासदार उदयनराजेंसोबत मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरणारे वकील, याचिकाकर्ते, अभ्यासक उपस्थित राहणार होते. या परिषदेत मराठा आरक्षणाची पुढिल लढाई कोणत्या पद्धतीनं लढायची याची दिशा निश्चित करण्यात येणार होती. मात्र, अचानक या बैठकीसाठी ज्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, त्या सर्व मान्यवरांना आजची परिषद रद्द करण्यात आल्याचा निरोप पाठवण्यात आला.
पाहा व्हिडीओ : पुण्यातील मराठा आरक्षण परिषद अचानक रद्द, खासदार उदयनराजेंनी बोलावली होती बैठक
दरम्यान, मराठा आरक्षण परिषद रद्द करण्याचा निर्णय उदयनराजे यांनीच घेतला आहे. खासदार उदयनराजे भोसले सध्या पुण्यातच आहेत. तसेच ते परिषदेचं आयोजन ज्या रेसिडेन्सी क्लबमध्ये करण्यात आलं होतं, त्याठिकाणी येणार असंही सांगण्यात आलं होतं. परंतु, अचानक बैठक का रद्द करण्यात आली यासंदर्भात कोणतीही माहिती मिळू शकतेली नाही. मराठा आरक्षण परिषदेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठेतरी सुटेल, ही अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. पण बैठक रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : खासदार उदयनराजे
सरकारी वकील गैरहजर, सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणावरील सुनावणी काही काळासाठी तहकूब
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
