एक्स्प्लोर

आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : खासदार उदयनराजे

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणावर आता चार आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील सरकारवर टीका करत इशारा दिला आहे.

नवी दिल्ली :  मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील सरकारवर टीका करत इशारा दिला आहे. फेसबुक पोस्टद्वारे इशारा देत खासदार उदयनराजेंनी म्हटलं आहे की,  आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र  सरकारचा वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असतानासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणावर आता चार आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. यामुळे सरकारला चार आठवड्यांची मुदत मिळाली आहे. या काळात पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाची स्थापना होऊन ते प्रकरण सुनावणीसाठी त्यासमोर लिस्टिंग व्हावं, यासाठी सरकार अर्ज करु शकतं. त्यामुळे पुढील सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाऐवजी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होईल, अशी अपेक्षा आहे.

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे की, जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसेल तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने  मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनावणी पार पडणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्याने काही काळ कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच सरकार आणि वकिलांमध्ये कसलाही समन्वय नाही, असेच सिद्ध होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता  संशयास्पद आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारी वकील गैरहजर, सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणावरील सुनावणी काही काळासाठी तहकूब

त्यांनी म्हटलं आहे की, मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती देवून चार आठवडे उलटून गेलेत तरीही सरकार सुस्तच आहे. आरक्षणाचा निकाल लागत नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न कायम आहे. शेकडो तरूणांच्या नोकरीचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याचा सरकारने तात्काळ जाहीर खुलासा करावा. मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची वेळ आता आली आहे. या उद्रेकाची सरकार वाट पाहतेय की काय? असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील असल्याची घोषणा केलीय. मात्र मराठा आरक्षणा बाबत सरकारची नेमकी दिशाच ठरलेली दिसत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकिल सुनावणीला हजरच नव्हते. त्यामुळे कोर्टाने काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे. आता तरी सरकारने तातडीने ठोस पाऊले उचलावीत. अन्यथा मराठा समाज सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget