Pune Maratha Reservation : मनोज जरांगेंची तब्येत खालावली; पुण्यात ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्येत खालावत आहे. त्यामुळे किवळेत आंदोलक रस्त्यावर उतरले. मुकाई चौकालगत त्यांनी रस्त्यावर बसून सरकारचा निषेध केला
पुणे : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला(Maratah Reservation) बसलेल्या मनोज जरांगेंची (Manoj Jarange Patil) तब्येत खालावत आहे. तरी राज्य सरकार जरांगेंच्या जीवाची पर्वा करेना, हे पाहून मराठा समाज अधिक आक्रमक होऊ लागलाय. पिंपरी चिंचवडमध्ये याचे पडसाद उमटत आहेत. पिंपरी चिंचवडचे प्रवेशद्वार (Pimpri-Chinchwad News) असणाऱ्या किवळेत आंदोलक रस्त्यावर उतरले. मुकाई चौकालगत त्यांनी रस्त्यावर बसून सरकारचा निषेध केला. सरकारने असाच कानाडोळा केला तर मराठा समाज आणखी आक्रमक होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
त्यासोबतच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Pune News) सकल मराठा समजाचं आंदोलन सुरु आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात सकल मराठा समाज आंदोलन करत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच नाही तर पुणे शहरात ठीक ठिकाणी आज सकाळपासून मराठा समजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुरू आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मराठा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. त्यासोबत रस्ता रोकोची परवानगी नाकारल्याने वाघोली परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोली पोलिस चौकीतच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
राज्यात सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नांदेड-हिंगोली, परभणीसह विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झालं आहे तसेच जेलभरो आंदोलनही करण्यात येत आहे.
कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देणार
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठ समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. म्हणजेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल येत्या 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मांडला जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ट
इतर महत्वाची बातमी-