(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : मराठा नेत्यांना कार्यक्रम, सभा घेऊन देणार नाही; पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाज आक्रमक
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देतानाच पिंपरी चिंचवडमध्ये मराठा नेत्यांना कार्यक्रम आणि सभा घेऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.
पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे (maratha reservation). मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारला दिलेला वेळ संपल्याने जरांगे यांनी उपोषणाची भूमिका ठाम ठेवली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देतानाच पिंपरी चिंचवडमध्ये मराठा नेत्यांना कार्यक्रम आणि सभा घेऊ देणार नसल्याचं तसेच आमच्या आंदोलनातही त्या राजकीय नेत्यांना सहभागी होण्यापासून रोखू, अशी आक्रमक भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे मराठे एकवटले आहेत आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाज मागील 40 वर्षापासून आंदोलन करत आहे. हा समाज शेतीवर अवलंबून आहे. आतापर्यंत सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हेडसांड होते आहे आणि त्यांना नाहक त्रासदेखील सहन करावा लागत आहे. ही सगळी परिस्थिती पाहून जरांगे पाटलांनी 17 दिवसांचं आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर 40 दिवसाची मुदत दिली होती. मात्र सरकारने त्यावर काहीही उत्तर दिलं नाही. समाजाला पाठिंबा देण्याचं उपोषण करा आणि त्यासोबतच सर्व राजकीय नेत्यांना त्यांनी अनेक गावात बंदी घातली आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याने पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेऊ नये अन्यथा समाजाकडून कार्यक्रमाला विरोध केला जाईल, असा इशारा मराठा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.
अजित पवारांनी कारखान्यावर जाऊ देणार नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि साखर कारखान्याला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येणार आहेत. मात्र, अजित पवारांच्या या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि कारखान्याला दिले आहे. जर अजित पवार कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. बारामती तालुक्यात कोणत्याच राजकीय पक्षाच्या लोकांना बारामती फिरु देणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे.
इतर महत्वाची बातमी-