एक्स्प्लोर
पुण्यात गिरीश बापट, वंदना चव्हाणांच्या घरासमोर ठिय्या
सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे आज लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं जातंय.
पुणे: सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे आज लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं जातंय. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर, मराठा क्रांती मोर्चातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नवी पेठेतील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
वंदना चव्हाण संसदीय अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याने त्यांच्या पतींनी मराठा मोर्चाचे निवेदन स्वीकारले.
दरम्यान, सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीला कोणीही जाणार नाही, असं मोर्चाच्या पुण्यातील समन्वयकांनी सांगितलं.
मुंबईत बैठक
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध क्षेत्रातील मराठा समाजातील मान्यवरांसोबत मंथन करणार आहेत. सिनेमा, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज बैठकीसाठी उपस्थित आहेत.
बैठकीला कोण कोण उपस्थित?
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, अभिनेते सयाजी शिंदे, उद्योजक भैरवनाथ ठोमरे आणि उद्योजक डॉ. सतीश परब यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.
श्रीमंत शाहू महाराज अनुपस्थित
मराठा आरक्षणपश्नी बोलावलेल्या बैठकीला जाण्यास कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी नकार दिला आहे. आरक्षणावर तोडगा काढणासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांसह इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांना निमंत्रण देण्यात आलं. मात्र मराठा आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर या तिघांनीही बैठकीस जाण्यास नकार दिला.
58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळाल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष्यं केलं.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीस श्रीमंत शाहू महाराजांचा नकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement