एक्स्प्लोर

Pune News : जातिवंत मराठा असाल, तर थोडीतरी लाज बाळगा; मनोज जरांगेंबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरुन बाळा भेगडेंना मराठा आंदोलकानं झापलं? कथित ऑडीओ क्लिप व्हायरल

Pune News : सोशल मीडियावर एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. या फोन रेकॉर्डिंगमध्ये बाळा भेगडे यांना मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पोखरकर फोन करतात आणि त्यांच्यात एका व्हायरल क्लिपवरुन रंगलेला संवाद ऐकायला मिळत आहे.

Pune News : पुणे : पुण्यातील (Pune News Updates) भाजपचे (BJP) माजी आमदार आणि मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) पदाधिकाऱ्यांच्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. मावळचे माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्यासोबतचा हा संवाद असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

बाळा भेगडे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर गंभीर आरोप केल्याचा दाखला देत फोन करून त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, हा आवाज भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांचाच आहे, याची पुष्टी मात्र एबीपी माझा करत नाही. सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालेला या संवादावरून उलटसुलट चर्चा मात्र रंगू लागल्या आहेत. 

सोशल मीडियावर एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. या फोन रेकॉर्डिंगमध्ये बाळा भेगडे यांना मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पोखरकर फोन करतात आणि त्यांच्यात एका व्हायरल क्लिपवरुन रंगलेला संवाद ऐकायला मिळत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजावर बोलणाऱ्या बाळा भेगडे यांना मराठा बांधवांनी झापलं, असं नमूद करत बाळा भेगडे आणि मराठा बांधव विनोद पोखरकर यांच्यातील संवाद व्हायरल होत आहे. 

व्हायरल फोन रेकॉर्डिंगमध्ये नेमका संवाद काय?

मराठा बांधव (विनोद पोखरकर) : नमस्कार, मी विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चामधून...

बाळा भेगडे : बोला ना... बोला... 

मराठा बांधव (विनोद पोखरकर) : तुमची एक क्लिप ऐकली मी... त्यात तुम्ही म्हणताय की, मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील, किंवा आम्ही त्यांना हे करू, ते करू, काय अडचण आहे नेमकी? तुम्हाला कोण म्हटलं की, मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली. आहे का काही तुमच्याकडे? तुम्हीही मराठाच आहात ना? काय असे उद्योग करताय, फडणवीस XXXXXXX नादामध्ये... तुम्ही शर्यत लावली आहे का? मी जास्त XXXXXXX की तू XXXXXXX? ते दरेकर वेगळे, ते लाड वेगळे, ते सदाभाऊ खोत वेगळे... आता तुमची एक भर त्यात पडली, त्यात शेलार आहेत मुंबईत. काय चाललंय काय नेमकं? तिकीटासाठी चाललंय काय सगळं? 

बाळा भेगडे : आम्ही तिकीटासाठी काम करत नाही. 

मराठा बांधव (विनोद पोखरकर) : थोडी तरी लाज वाटू देत ना, जातिवंत मराठा असाल ना तुम्ही, तर त्याची थोडी तरी लाज वाटू देत... मनोज जरांगे पाटलांनी, बिचाऱ्यांनी आपलं घर-दार वाऱ्यावर सोडलंय. तो माणूस समाजासाठी लढतोय, तुम्ही त्या महाविकास आघाडीच्या लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली एवढी वर्ष, तुम्ही सांगताय की, जरांगेंनी त्यांची सुपारी घेतली. लाज वाटली पाहीजे बाळा भेगडे तुम्हाला, आमदार आहे तुम्ही माजी आमदार...

बाळा भेगडे : तुम्हाला जे वाटतंय, त्याबाबत आपण भेटून बोलू

मराठा बांधव (विनोद पोखरकर) : अहो भेटून काय बोलायचं? मी तुमची क्लिप ऐकली, मी तुमच्या क्लिपवर बोलतोय... आता एक सांगितलं दुसरंही सांगतोय, हा जातीवंत मराठा आहे... तुम्ही कोणालाही जाऊ तक्रार केली, तरी काहीच फरक पडणार नाही. तुमच्यासारख्या लाचार लोकांमुळे आज ही मराठा समाजाची अवस्था आहे. त्या महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं, त्यामुळेच तुम्हीला 2014 ला सत्ता दिली आणि तुम्ही काय केलं? तुम्ही सांगता 2014 ला सत्तेत आल्यावर फडणवीसांनी आरक्षण दिलं. काय केलं फडणवीसांनी? 2016 मोर्चे निघाले, त्यानंतर 2018 ला पावलं उचलली गेली. हजारो तरुणांनी जीव दिलाय, तुमच्याकडे मावळमध्ये काय परिस्थिती झाली... माहीत नाही का तुम्हाला? फुटक आरक्षण दिलं का? दिलं ते टिकलं का? तुम्हाला तिकीट पाहीजे ना, तुम्ही तुमच्या जीवावर तिकीट घ्या, जरांगे पाटलांवर घसरु नका. आज फक्त फोन करून तुम्हाला जाब विचारतोय, आई शप्पथ सांगतो, नंतर मावळात येऊन गाठीन. मी पण पुण्याचाच आहे, बाहेरचा नाही. जिल्ह्यातलाच माणूस आहे मी. 

बाळा भेगडे : अरे ऐक ना... मी सांगतोय ना, मी येतो तू सांगशील तिथे, तू अजिबात काळजी करू नकोस, तू नको काळजी करूस

मराठा बांधव (विनोद पोखरकर) : काळजी करण्याची गरज नाही... मी न सांगता गाठीन, परत जर न सांगता मनोज जरांगेंवर घसरलात ना, सोडणार नाही आई शप्पथ सांगतो. मग सगळं विसरुन जा राजकाण आणि हे ते... भाजप, महाविकास आघाडी आम्हला काहीच घेणंदेणं नाही... समजलं का? याला धमकी समजायची तर धमकी समजा, नाहीतर आणखी काही समजा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget