राजगुरुनगरात मनोज जरांगेंचा हुंकार, सुनील कावळेंचं बलिदान वाया जाणार नाही, कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही!
मराठ्याच्या आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या, असे मनोज जरांगे म्हणाले.

पुणे : मराठा समाजातील (Maratha Reservation) एका बांधवाने काल आत्महत्या केली. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला. मराठा समाज कावळेंचे (Sunil Kawale Suicide) बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही, असा हुंकार मराठा आंदोलक मनोज जरांगेनी दिला आहे. तसेच मनोज जरांगेसह आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगेनी केला आहे. राजगुरूनगरमधील सभेत मनोज जरांगे (Manoj Jarange RajguruNagar Pune Sabha) बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, मला मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही. मी हार, तुरे स्विकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गावागावात फिरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या.
मराठ्यांना शांततेच आरक्षण मिळवून देणार
मराठ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. हे शांतता युद्ध आहे. ठोकल्याशिवाय आंदोलन मिळत नाही, अशी एकेकाळी मराठा समाजाची भावना होती, पण आता शांततेच आरक्षण मिळवणार असा शब्द आहे. मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय समाज एक इंचही मागे जाणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षण समाजाने समजून घेण गरजेचं
मनोज जरांगे म्हणाले, मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे. मायबापाच्या शब्दापुढे नाही. आपल्या वाट्याला कष्ट आले परंतु लेकरांच्या वाट्याला हे नको. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे. मराठा आरक्षण समाजाने समजून घेण गरजेचं आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की पुरावे लागतात. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने वेळ एक महिन्यांचा वेळ मागितला. सरकारला आपण चाळीस दिवसांचा वेळ दिला. आपण मुदत दिल्यानंतर हालचालीनंतर वेग आला आहे.
शांततेने आंदोलन करायचे आहे
मी मराठ्यांशी गद्दारी करायची नाही. मी मरेपर्यंत मराठा समाजांशी गद्दरी करणार नाही. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी मी उभा आहे. 24 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरणार आहे. उद्रेक करायचा नाही. उद्रेक केला तर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे आपण शांततेने आंदोलन करायचे आहे. उग्र आंदोलन करायचे नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
