Pune : पुण्याच्या तरुणानं तयार केलं नाण्याचं शिवलिंग; 79 हजार 307 रुपये किंमतीची वापरली नाणी
Pune : महाशिवरात्रीचं निमित्त साधून पुण्यातील तरुणाने चक्क नाण्यापासून शिवलिंग तयार केले आहेत.
Pune Deepak Gholap : पुण्यातील तरुण अनेक सणांच्या संधी साधून नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात पुण्यातील अनेकांनी विक्रमदेखील केले आहेत. आज महाशिवरात्रीचं निमित्त साधून पुण्यातील तरुणाने चक्क नाण्यापासून शिवलिंग तयार केले आहे. यासाठी 22 हजार 301 नाण्यांचा वापर करण्यात आला आहे. 79 हजार 307 रुपये किंमतीची नाणी वापरली आहे. या शिवलिंगाची गेल्या वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली होती.
दीपक घोलप असं या तरुणाचं नाव आहे. जगातील अशा प्रकारचे हे पहिले शिवलिंग असल्याचा दावा या तरुणाने केला आहे. दीपक हा शिवभक्त असून तो दररोज शिवमंदिरात दर्शनासाठी जात असतो. यापेक्षा काहीतरी वेगळं करायला हवं, असा विचार करून त्याला नाण्यांनी शिवलिंग बनवण्याची कल्पना सुचली. त्यांनी दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी जमा करायला सुरुवात केली. चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर अखेर त्यांनी एका आकर्षक शिवलिंगाला आकार दिला. गेल्या वर्षभरापासून या शिवलिंगाची परिसरात चर्चा होत आहे. 22 हजार 301 दोन रुपयांची नाणी, 14 हजार 916 पाच रुपयांची नाणी, 4 हजार 875 दहा रुपयांच्या नाण्याचा वापर करुन हे शिवलिंग तयार केलं आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
दीपक घोलप याने तयार केलेल्या आकर्षक शिवलिंग पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करताना दिसत आहे. अनेकांकडून त्याचा कौतुक देखील केलं जात आहे. मागील अनेक दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करून त्याने हा शिवलिंग तयार केला आहे. त्याचा याच शिवलिंगाची दाखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून घेण्यात आले आहेत. त्याचं या शिवलिंगाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.
शिवलिंगाचं निरिक्षण...
पुण्यातील अनेक मुलं शिवभक्त आहेत. अनेक तरुणांनी हातावर टॅटूही काढून घेतले आहेत. मात्र दीपकने टॅटू वगरे न काढता थेट नाण्यांचं शिवलिंग तयार करण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी नाणी जमवायला सुरुवात केली. पुण्यात अनेक शिव मंदिरं आहे. शिवाय पुणे जिल्ह्यात बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक भीमाशंकर ज्योतीर्लिंग आहे. या ज्योतीर्लिंगाच्या दर्शनासाठी लाखो नागरिक दरवर्षी येत असतात. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. पुणे जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दीपकदेखील अशा अनेक शिव मंदिरांना भेटी देत असतो. शिवलिंगाचं निरिक्षण करतो.