(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Terrorist: पुणे ATS कडून उत्तर प्रदेशमध्ये मोठी कारवाई; लष्कर - ए - तोयबाच्या अतिरेक्याला अटक
पुणे दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. पुणे दहशवाद विरोधी पथकाने लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे अटक केली आहे.
Pune ATS: पुणे दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. पुणे दहशवाद विरोधी पथकाने लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे अटक केली आहे. इनामुल हक असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण जुनैद मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांच्या संपर्कात होता. आज (13जून) पुणे न्यायालयात त्याला हजर करणार आहेत.
इनामुल हक हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वीच अटक केली होती. जुनैद नंतर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या या तरुणालाही पुणे दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सोशल मीडियावरुन बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता.
लष्कर ए तोयबासाठी काम केलं तर पैसे मिळेल. यावरुन जुनेदला अटक करण्यात आली होती. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे उघड झालं होतं.सोशल मीडियाच्या माध्यमातून कश्मिर संघटनेच्या संपर्कात आला होता,अशी माहिती आहे. तसंच इनमुलदेखील जुनैदप्रमाणेच वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दशहतवादाकडे ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आलं आहे.अधिक चौकशीसाठी एटीएसकडून त्याची कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती आहे.
जुनैद मोहम्मला मिळत होते पैसे
पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनूसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापुर्वीच जनैदच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. मात्र हे पैसे त्याला कुठल्या कामासाठी देण्यात आले होते हे मात्र अजून उघड झाल नसल्याचं देखील पुणे एटीएसने सांगितलं होतं
राज्यात कारवायांसाठी काश्मीरच्या एका संघटनेने त्याला महिनाभरापुर्वी 10 हजार रुपये पाठवले होते.त्याच्या वैयक्तिक बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले होते. अनेक दिवसांपासून पुणे दहशतवादी विरोधी पथक आरोपीच्या मागावर होते. अखेर पुणे दहशतवादी विरोधी पथकाने आज मुसक्या आवळल्या होत्या.
विदर्भाशी काय कनेक्शन?
आरोपी जुनेद मोहम्मह हा २८ वर्षांचा असून मुळचा विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जुनेदला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा पुणे दहशतवादी विरोधी पथकाचा आरोप आहे.