एक्स्प्लोर

Sanjay Raut : आगामी निवडणुकीसाठी तुरुंगातली कैद्यांना बाहेर काढलं जात आहे; संजय राऊतांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

आगामी निवडणुकीसाठी तुरुंगात असलेल्या कैद्यांना बाहेर काढले जात आहे. कैद्यांना जेलमधून बाहेर काढून त्यांना राजकारणात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी राज्य सरकारवर केला आहे.

Pune News: दौंड, पुणे : राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. भाजप गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याचा (Crime) आरोप अनेक विरोधक करत आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील कैद्यांवरुन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आगामी निवडणुकीसाठी तुरुंगात असलेल्या कैद्यांना बाहेर काढले जात आहे. कैद्यांना जेलमधून बाहेर काढून त्यांना राजकारणात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले आहे. त्यासोबतच अनेक मुद्द्यांवरुन त्यांनी सरकारवर हल्लाबोलदेखील केला.

कैद्यांवरुन सरकार गंभीर आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, येणाऱ्या 2024 निवडणुकीत भाजप आणि शिंदे या गुन्हेगारांचा आणि काही त्यांचा निवडणुकीत दडपशाहीसाठी वापर करणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांच्या नेत्याचा एक पथक नेमले असून गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढण्याचे काम हे सरकार करत आहे. कुठला पोलीस अधिकारी जामीनावर सुटून सरकारसाठी काम करत आहे. याची माहिती लवकरच उघड करणार आहे. 

बारामतीत शरद पवार जो उमेदवार देतील तोच निवडून येणार

येत्या निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की,  भाजप हा आंतरराष्ट्रीय पक्ष, तो बाहेर देशात जाऊनसुद्धा निवडणूक लढवेल. त्यांचं ते देखील टार्गेट असू शकतं. मात्र भाजपनं 12 गावचे लफंगे घेऊन पक्ष स्थापन केला आहे. त्यांच्याकडे स्वतःचं असं काही नाही. बारामतीत भाजपचा स्वतःचा उमेदवार असा कोणी नाही. शुद्ध आणि हिंदुत्ववादी उमेदवार नाही. त्यामुळे बारामतीत शरद पवार जो उमेदवार देतील, तोच निवडून येणार, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. 

2024 मध्ये मोदी येणार नाही...

संजय राऊत म्हणाले की,  मोदींनी ज्यांच्यावर आरोप केले ते मंत्रिमंडळमध्ये आहेत. त्यात हर्षवर्धन पाटील म्हणतात मला शांत झोप लागते. आजही देशात आमच्या सारखे लोक आहे. आम्ही गुडघे टेकणार नाही. आज भाजपमध्ये गेले आहेत ते 2024 ला आमच्या दारात उभे राहतील.ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते लोकांना आवडलं नाही. 2024 मोदी येणार नाही.सरकारने पालिका जिल्हा परिषद घेण्याची हिम्मत दाखवावी. मोदींनी प्रचाराला यावे आणि एक महिना राहावे आणि मुंबई महापालिका जिंकून दाखवावी, असा आव्हानंही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut Daund: संजय राऊतांना गावबंदीचा फटका; दौंडमध्ये मराठा आंदोलनकांनी राऊतांना अडवलं, मोठमोठ्याने घोषणाबाजी सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Embed widget