(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramnath Kovind In Pune : महाराष्ट्राच्या महिला कर्तबगार आहेत; सावित्रीबाई, आनंदीबाई आणि प्रतिभाताई पाटील हे याचं मोठं उदाहरण
Ramnath Kovind In Pune : महाराष्ट्राच्या महिला कर्तंबगार आहेत. सावित्रीबाई, आनंदीबाई आणि प्रतिभाताई पाटील हे याचं मोठं उदाहरण आहे, असं म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महिलांचं कौतुक केलं.
Ramnath Kovind In Pune : मी प्रतिभाताईंकडून अनेक गोष्टी शिकलो.आम्ही सोबत काम करतो. आतापर्यंत 13, 14 वेळा मला महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. प्रतिभाताईंसोबत चर्चा झाली शेवट त्यांच्या बोलवण्यालरुन मी आज इथे आलो.त्यांनीही महाराष्ट्राची मान उंचावली आहे, असं म्हणत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या कार्याचं कौतुक केलं.
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दौऱ्यावर आहेत. दत्तमंत्र पठण करत रामनाथ कोविंद त्यांनी भाषणाला सुरुवात केली. जितकी खुर्ची उंच तितकी जबाबदारी जास्त असते. प्रतिभाताई पाटील यांच्या शिफारसीने मी इथे आलो. लक्ष्मीबाई दगडूशेठ ट्रस्टचं कार्य जवळून बघायला मिळालं. त्यांचं कार्य अफाट आहे, असं म्हणत त्यांनी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राची भूमी सर्वगुणसंपुर्ण आहे. याच भूमीत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराचा जन्म झाला. संत नामदेव यांच्यामुळे ही भूमी पावन झाली. याच भूमीवर दगडूशेठ गणपतीचं मंदिर असणं अत्यंत चांगली गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळापासूनच महाराष्ट्र सगळ्याबाबतीत अग्रेसर होतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची घोषणा केली. मराठ्यांचा असलेला प्रभाव कायम आपल्या देशाला एकजूट करण्यात महत्वाचा होता. अनेकता हिच एकता हे याच मराठ्यांनी भारतात अनेक वर्षांआधी बिंबवलं.मागच्या वर्षी याच माहाराजांच्या पवित्र ठिकाणी म्हणजेच रायगडावर जाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं,असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र ही संताची भूमी तर आहेच मात्र महाराष्ट्रातील महिलांनी देखील अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा याच पुण्यात सुरु केली. पहिली महिला डॉ.आनंदीबाई गोपाळ जोशी या भूमिला अभिमान बाळगायला शिकवला. भारताच्या पहिला महिला राष्ट्रपतीचा मान मिळवत प्रतिभाताई पाटील यांनी या भूमीला पुन्हा एकदा मान उंचावण्याची संधी दिली, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचं कौतुक केलं.
दगडूशेठ ट्रस्टने महाराष्ट्राला जनआंदोलनाची भूमी बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली.यासाठी मी त्यांचं कायम कौतुक करेल. जनआंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकारानी याच भूमिपासून केली. वंचित जातीचे असूनसुद्धा त्यांनी मोठ्या संघर्षाने भारताची शैक्षणिक मान उंचावली, असंही ते म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दत्त मंदिर ट्रस्टचे प्रदीप परदेसी हे उपस्थित होते.