ऐकावं ते नवलंच! एका मांजरीमुळे पिंपरी चिंचवडची बत्ती गुल अन् शंभर कोटींचा फटका
महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्याने पुण्याच्या भोसरी आणि आकुर्डीत बत्ती गुल झाली. याचा फटका आकुर्डी, भोसरी, भोसरी एमआयडीसी भागातील साठ हजार ग्राहकांना याचा मोठा फटका बसला आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडला एका मांजरीमुळं शंभर कोटींचा फटका बसला आहे. पिंपरी चिंचवडमधील महापारेषनच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज मांजर घुसल्याने शहरातील बत्ती गुल झाली. विजेच्या धक्क्याने मांजरीच्या जागीच मृत्यू झाला. पण आकुर्डी, भोसरी, भोसरी एमआयडीसी भागातील साठ हजार ग्राहकांना याचा मोठा फटका बसला आहे.
महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्याने पुण्याच्या भोसरी आणि आकुर्डीत बत्ती गुल झाली आहे. जवळपास 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे पहाटे सहा पासून सायंकाळपर्यंत वीजपुरवठा खंडीत झाला होता. सध्या पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. मात्र रविवारपर्यंत बारा तास लोड शेडिंगचा सामना ठरलेला आहे. ऐन उन्हाळ्यात एवढा मोठी समस्या ओढावली आहे. त्यामुळं एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त झालेत तर दुसरीकडे भोसरी एमआयडीसीतील अनेक कंपन्या ठप्प झाल्यात, परिणामी शंभर कोटींचा भुर्दंड बसणार आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्याला रविवारचा दिवस उजाडणार आहे. तोपर्यंत हा आकडा दोनशे कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. एका मांजरामुळं पिंपरी चिंचवडची ही अवस्था झाली आहे.
भोसरी एमआयडीसी मधील 7500 कंपन्यांना बारा तास वीज पुरवठा होणार आहे. तर बारा तासांचे लोड शेडिंग सुरू राहणार आहे. पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये दुरुस्ती होईपर्यंत म्हणजे शनिवार अथवा रविवारपर्यंत अशी परिस्थिती राहणार असल्याचे महावितरण विभागाने स्पष्ट केलं आहे.
प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे.
प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :