Maharashtra Pune crime News: तळजाई जंगलात आढळला मृतदेह, परिसरात भीतीचं वातावरण
Maharashtra Pune crime News: तळजाई जंगलात झाडाला लटकलेला मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Maharashtra Pune crime News: पुण्याच्या (pune) तळजाई टेकडीच्या (taljai hills) जंगलात धक्कादायक प्रकार घडला आहे. 24 मे रोजी दुपारी एका झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या एकाचा मृतदेह सापडला आहे. मात्र या व्यक्तीची ओळख अजूनही स्पष्ट झाली नाही आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
पुण्यातील तळजाई टेकडीजवळील जंगल मॉर्निंग वॉकसाठी (morning walk) प्रसिद्ध आहे. रोज सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी अनेक नागरिक येत असतात. या परिसराच्या आजुबाजूला दाटीवाटीचं जंगल आहे. याच परिसरात 24 मे रोजी दुपारी एका झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.
या घडलेल्या घटनेची माहिती फिरायला आलेल्या एका नागरिकाने सहकार नगर पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर सहकार नगर पोलीस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणीसुद्धा केली. यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा मृतदेह किमान तीन दिवस अगोदरचा आहे. त्या व्यक्तीने तीन दिवस आधी आत्महत्या केल्याचा अंदाजही यावेळी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकाराचा पोलीस तपास करत आहे. आत्महत्या करुन किमान तीन दिवस झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे आणि मृतदेहाची अजूनही ओखळ पटली नसल्याचे सहकार नगर पोलिसांनी सांगितलंय.
लोणवळ्यातही आढळला होता मृतदेह
दिल्लीहून लोणावळ्याला (lonavala trip) सहलीसाठी आलेला तरुण 20 मे रोजी बेपत्ता झाला होता. मागील तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. अखेर आज त्याचा मृतदेह लोणावळ्याच्या जंगलात सापडला होता. फरहान शहा (farhan shah death) असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो दिल्लीहून लोणवळ्यात सहलीसाठी आला होता. फिरायला गेल्यानंतर तो हरवला. लोणावळा पोलीसांसह इतर काही स्थानिक पथकांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो मृतावस्थेत सापडला. जंगलातील रस्ता चुकल्याने ते भटकत राहिला त्यानंतर खोल दरीत पडला असेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.