एक्स्प्लोर

Chandrakant Patil: आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटी देणार; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.  

Chandrakant Patil: आळंदी (alandi) विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केली.  सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव उपस्थित होते.

आळंदी देवस्थानच्या जमिनींवर शासनाकडून गायरान जमिनीचा शेरा दिल्याने जागेच्या विकासावर मर्यादा आल्या. महसूल मंत्री असताना समितीच्या सदस्यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ वारकरी बांधवांच्या सुविधेसाठी 400 एकर जमीन देवस्थानला देण्याचा निर्णय घेतला. या जागेच्या विकासासाठी 200 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला पुणे महानगर विकास प्राधिकरणाची मान्यता घेण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल. महसूल मंत्री असताना मंदिर परिसरातील जागेचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचं देखील ते म्हणाले. 

व्हर्चुअल वारीसाठी 25 कोटी

आराखड्यातील कामे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. पहिल्या टप्प्यात भक्त निवास, वारकऱ्यांच्या राहुट्या उभारण्यासाठी ओटे आणि आभासी (व्हर्चुअल) वारीसाठी 25 कोटींचा निधी देण्यात येईल. व्हर्चुअल वारीमुळे पंढरपूरला जाऊ न शकलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. संस्थानने त्याचे डिझाईन त्वरीत तयार करावे. नगर परिषदेच्या माध्यमातून ही कामे करण्यात येतील. पुढील टप्प्यात रुग्णालय व इतर कामांचादेखील समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीत येतात. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी जगणाऱ्या वारकऱ्यांची भेट होईल म्हणून मी आळंदीत. जनतेची सेवा करण्यासोबत अशा देवस्थान परिसराचे प्रश्न सोडविण्याचे समाधान असल्याचेही त्यांनी म्हटलंय.

10 ते 12 लाख भाविक येण्याची शक्यता

यंदा कोरोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे. त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत. निर्बंधमुक्त यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच ही कार्तिकी एकादशी पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget