Supriya Sule : काहीही झालं तरी माझ्या भावावरच खापर फोडलं जातं; सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण
काहीही झालं तरी माझ्या बिचाऱ्या भावावरच खापर फोडलं जातं, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे.
Supriya Sule : दिवसभर अजित पवार राजकीय (ajit pawar) भूकंप करतील (maharashtra political news ) अशा चर्चा सगळीकडे सुरु होत्या. ते नाराज आहेत, असंही बोललं गेलं. त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीत राहणार असं अजित पवार म्हणाले मात्र या सगळ्याबाबत खासदार आणि अजित पवार यांची बहिण सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी पाठराखण केली आहे. 'काहीही झालं तरी माझ्या बिचाऱ्या भावावरच खापर फोडलं जातं, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे.
अजित पवार नाराज आहेत का? यावर प्रश्न विचारल्यास त्या म्हणाल्या की राज्यात काहीही झालं तरी माझ्या भावावर त्या गोष्टीचं खापर फोडलं जातं. जे नाणं चालतं त्याच नाण्याला भाव दिला जातो. शरद पवारांवरदेखील असे आरोप करण्यात आले होते. भूकंप झाला तरीही त्यांनीच केला अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र यात काहीही तथ्य नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमचं काम सर्वात जास्त महत्वाचं आणि गंभीर आहे. आम्ही कोणाचं मनोरंजन करण्यासाठी नाही तर आम्ही पॉलिसी मेकर आहोत. त्यामुळे आमची कामं आम्ही चोख करतो. कोण कोण नेते नॉट रिचेबल आहेत. याकडे पाहण्याची गरज नाही. सगळे कोणत्या ना कोणत्या कामासाठी प्रवास करत असतात. त्यामुळे कधीही कोणाच्या मोबाईचं नेटवर्क जाऊ शकतं. त्यामुळे लगेच एखादा नेता नॉट रिचेबल म्हणून बातम्या करुन चालत नसल्याचं त्या म्हणाल्या.
कुणी नाराज असेल तर चर्चा करु...
राष्ट्रवादीतील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. अजित पवार यांच्यासोबत आम्ही आहोत, असं आमदारांकडून सांगण्यात येत आहे यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी आणि अजित पवार कायम आमचे नेते आणि आमदार यांच्यासोबत आम्ही काय संपर्कात असतो. त्यामुळे त्यांच्यात काहीही नाराजी असेल तर आम्ही सगळ्यांशी चर्चा करु, असंही त्या म्हणाल्या.
"बायको रुसली की लगेच सोडून जाते का?"
राष्ट्रवादीचे 40 आमदार नाराज असल्याच्या सगळीकडे चर्चा रंगल्या आहेत. मात्र ते अजित पवार यांच्याबरोबर असल्याचं बोलत आहेत यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे. लग्न झाल्यावर बायको नाराज असेल तर ती काय लगेत सोडून जाते काय? असं त्या म्हणाल्या.