एक्स्प्लोर

Pune Lockdown | पुण्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे का? महापौर मुरलीधर मोहोळ म्हणतात...

पुणे शहरातील परिस्थिती चांगली आहे. जनजीवन सुरळीत होण्यासाठी सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे सध्यातरी पुण्यात कडक लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असं मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं आहे.

पुणे : पुण्यासारख्या रुग्ण संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. हायकोर्टाच्या सूचनेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कडक लॉकडाऊनबाबत निर्णय होणार का असा प्रश्न आहे. मात्र सध्यातरी पुण्यात आहे त्यापेक्षा कडक लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असं मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं आहे. 'एबीपी माझा'शी त्यांनी संवाद साधला.

महापौर म्हणाले की, "हायकोर्टात जी माहिती सादर केली जाते त्यानुसार कोर्ट मत मांडतं. मुळात हायकोर्टात सादर केलेली माहिती,आकडेवारी कधीची आहे? राज्य सरकराच्या आकडेवारीत विसंगती पाहायला मिळत आहे. सध्या पुणे शहराची परिस्थिती अत्यंत चांगली आहे, नियंत्रणात आहे. मागील 15 दिवसात अॅक्टिव रुग्णांची संख्या 16 हजाराने घटली आहे." 

पुण्यात सध्यातरी लॉकडाऊनची गरज नाही : महापौर
"पुण्यात मागील महिनाभरापासून लॉकडाऊनच आहे. या परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. यंत्रणा सुरु आहे. सकाळी सात ते सकाळी अकरापर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. यापेक्षा कडक लॉकडाऊन काय असू शकतं? त्यामुळे सध्यातरी पुण्यात कडक लॉकडाऊनची आवश्यकता नाही," असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

'संपूर्ण पुणे जिल्ह्याची मिळून आकडेवारी सादर केली असावी'
"मुंबईने चांगलीच कामगिरी केली आहे, त्यांचं कौतुक आहे. पण पुणे शहरातील अॅक्टिव रुग्णांची संख्या 39 हजार आहे, ती एक लाख दाखवली जात आहे. या एक लाखांमध्ये पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे जिल्हा असा सगळा मिळून आहे. ही आकडेवारी कोर्टात सादर केली असावी. त्यामुळे आता PMRD आणि MMRD याचीही तुलना करायला पाहिजे," असं मत महापौरांनी मांडलं.

'कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार'
आज पुणे शहरातील परिस्थिती चांगली आहे. जनजीवन सुरळीत होण्यासाठी सकारात्मक वातावरण आहे. पण अशा परिस्थिती रुग्ण संख्या जास्त असल्याचा मेसेज आला तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. या दृष्टीकोनातून महापालिका म्हणून आम्ही कोर्टात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करुन वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे सांगणार आहोत.

'वस्तुस्थिती आणि कोर्टात सादर झालेली आकडेवारी 100 टक्के वेगळी'
"वस्तुस्थिती वेगळी आणि कोर्टासमोर सादर झालेली आकडेवारी वेगळी आहे. ही आकडेवारी कोणी आणि कशी सादर केली याची माहिती घेत आहोत. नागिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून आम्हाला खुलासा करावा लागत आहे," असं महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget