Pune BJP News: पुण्यातील भाजपच्या उमेदवार निवडीवर खासदार मेधा कुलकर्णी नाराज? गुलजारांचा शेर टाकून मनातली खदखद बाहेर काढल्याची चर्चा
Pune BJP News: काहींनी नेत्यांना घेरलं, शिव्या, शाप दिले, तर काही इच्छुक उमेदवारांनी आत्महदनाचा प्रयत्न देखील केला, यावर आता भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही नाराजी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

पुणे: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला, धुळे, नाशिक, नागपूर या महापालिकांसह राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपाच्या (BJP) निष्ठावंतांचा संताप झाल्याचं चित्र दिसून आलं. अनेक वर्षांपासून पक्षामध्ये काम करत असताना निवडणुकीमध्ये (Election) मात्र इतर पक्षातून आलेल्यांना महापालिकांमध्ये उमेदवारी दिल्याने इच्चुक उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक झाला. यावरून ठिक-ठिकाणी पक्षाबद्दलची नाराजी व्यक्त केली गेली. काहींनी नेत्यांना घेरलं, शिव्या, शाप दिले, तर काही इच्छुक उमेदवारांनी आत्महदनाचा प्रयत्न देखील केला, यावर आता भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही नाराजी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.(Pune BJP News)
भाजपने अनेक विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नेत्यांच्या घरात उमेदवारी देणार नाही म्हणत अनेकांच्या घरात तीन तीन उमेदवारी दिली, यामुळे अनेक इच्छुकांनी संताप व्यक्त केला. उमेदवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि अर्ज छाननीच्या दिवशी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांचा संतापाचा उद्रेक बघायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आत्मदहनाचा प्रयत्न झाला. मंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड यांच्या गाड्यांना कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी घेराव घातला गेला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या गाड्या काळ्या केल्या. फोटो फाडले, आरोप प्रत्यारोप केले. या परिस्थितीवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. निष्ठावंतांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे पक्षाला महागात पडू शकतं, अशा प्रकारची सूचक भूमिका त्यांनी आपल्या सोशल मिडीयावरती मांडली आहे.
Medha Kulkarni Social Media Post: मेधा कुलकर्णी यांची पोस्ट
#निष्ठावानकार्यकर्ते pic.twitter.com/stfKS8FRa7
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) December 31, 2025
मेधा कुलकर्णी यांनी या वादात उडी घेत कार्यकर्त्यांच्या जाहीर नाराजीला पाठिंबा दर्शवत त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याच्या तर्चा आता अधिक तीव्र झाल्या आहे. मेधा कुलकर्णी यांनी एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "कुछ कह गए, कुछ सह गए. कुछ कहते कहते रह गए." तर पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायावरून मेधा कुलकर्णी एक शेर पोस्ट करत पक्षालाच सुनावल्याचं बोललं जात आहे. त्यांनी पोस्ट करताना सुरूवातीलाच निष्ठावंत कार्यकर्ते असेही नमुद केले आहे.























