एक्स्प्लोर

महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला यंदा 'महिंद्रा थार' जीप

महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात विजेत्या पैलवानाला चारचाकी वाहन देण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे.

मुंबई/पुणे : महाराष्ट्र केसरी हा प्रतिष्ठेचा किताब पटकावणाऱ्या पैलवानाला यंदा बक्षीस म्हणून जीपही मिळणार आहे. मानाच्या चांदीच्या गदेसोबतच महिंद्र अँड महिंद्र कंपनीची थार ही जीप देऊन गौरवण्यात येईल. महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात विजेत्या पैलवानाला चारचाकी वाहन देण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. याआधी 2013 साली तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी विजेता ठरलेल्या नरसिंग यादवचा स्कॉर्पियो देऊन गौरव करण्यात आला होता. यंदा 20 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र केसरीच्या लढतीत उपविजेत्या ठरणाऱ्या पैलवानाला बुलेट देण्यात येणार आहे. भारताचा ऑलिम्पियन पैलवान नरसिंग यादवनं 2011, 2012 आणि 2013 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. चाळीसगावचा विजय चौधरी गेली तीन वर्षे सातत्यानं महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावत आहे. पण सध्या डीवायएसपीच्या ट्रेनिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे तो यंदा महाराष्ट्र केसरीत खेळू शकणार नाही. चंद्रहार पाटील आणि अभिजीत कटके यांच्याबरोबरच लातूरचा सागर बिराजदार, कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा माऊली जमदाडे, सातारच्या मोही गावचा किरण भगत, पुणे शहरचाच साईनाथ रानवडे, बुलढाण्याचा बाला रफिक शेख, मुंबई उपनगरचा विक्रांत जाधव ही नावंही महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीत आहेत. या आठ पैलवानांपैकीच कुणीतरी एक की, कुणीतरी नवा पठ्ठ्या महाराष्ट्र केसरी जिंकतो याची कल्पना रविवारी भूगावच्या मैदानात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Pune FDA Action: पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारावर; अनेक मिठाईच्या दुकानावर छापे, 4 दिवसांत 45 लाख 70 हजार अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित
पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारावर; अनेक मिठाईच्या दुकानावर छापे, 4 दिवसांत 45 लाख 70 हजार अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित
Pune Baramati Crime News Mangesh Jagtap: 21 वर्षांचं प्रेम, लग्नाचे आमिष दाखवलं अन् महिलेसोबत नको ते केलं, अखेर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगतापांवर गुन्हा दाखल
21 वर्षांचं प्रेम, लग्नाचे आमिष दाखवलं अन् महिलेसोबत नको ते केलं, अखेर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगतापांवर गुन्हा दाखल
Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
Rohit Pawar: पुरावेच लागतात ना?, अंधभक्तांनो घ्या आता पुरावे.., रोहित पवारांचा पुन्हा खळबळजनक आरोप, थेट पुणे विद्यापीठाची प्रेसनोट दाखवली, गैरप्रकारांवर बोट
पुरावेच लागतात ना?, अंधभक्तांनो घ्या आता पुरावे.., आमदार रोहित पवारांचा पुन्हा खळबळजनक आरोप, थेट पुणे विद्यापीठाची प्रेसनोट दाखवली, गैरप्रकारांवर बोट

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget