Maharashtra Unlock : पाच स्तरात महाराष्ट्र अनलॉक होणार, तुमचा जिल्हा/शहर कोणत्या लेवलमध्ये?
येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पहिल्या स्तरात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंध असतील, तर तर पाचव्या स्तरातील निर्बंध अधिक कडक असतील. जाणून घ्या तुमचं शहर कोणत्या स्तरात? तसंच विभागवार पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता...
मुंबई : येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने पहाटे याबाबतची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार पहिल्या स्तरामध्ये येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधि असतील, तर तर पाचव्या स्तरातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या स्तरात आहे.
अनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 15 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल.
पहिल्या स्तरात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. तर दुसऱ्या स्तरात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्तरातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा सुरु राहिल.
Maharashtra Unlock : 7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी!
कोणतं शहर कोणत्या स्तरात?
जिल्हा भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के) पॉझिटिव्हिटी दर (टक्के)
स्तर पहिला
अहमदनगर २४.४८ ४.३०
चंद्रपूर ९.३० ३.०९
धुळे ४.२५ २.५४
गोंदिया ६.३२ २.३७
जळगाव १५.१७ १.६७
जालना १७.६५ २.०५
लातूर १५.१३ ४.२४
नागपूर ८.१३ ३.८६
नांदेड ४.२८ १.९३
यवतमाळ १३.५८ ४.१९
स्तर दुसरा
हिंगोली २९.३४ ४.३७
नंदुरबार २९.४३ ३.३१
स्तर तिसरा
मुंबई उपनगर १२.५१ ५.२५
ठाणे १९.२५ ७.५४
नाशिक १८.७१ ७.७५
औरंगाबाद २०.३४ ५.३८
अकोला ४३.०४ ७.७४
अमरावती २८.५९ ६.५६
बीड ४७.१४ ८.४०
भंडारा ४.४१ ७.६७
गडचिरोली ५.९२ ६.५१
उस्मानाबाद ३१.०९ ७.७०
पालघर ४८.९३ ५.११
परभणी १६.०२ ७.१०
सोलापूर ४४.३९ ६.७८
वर्धा ४.०४ ७.५७
वाशिम १८.९० ५.१९
स्तर चौथा
पुणे २०.४५ १३.६२
बुलडाणा ७.७१ १०.०३
कोल्हापूर ७१.५० १५.२५
रायगड ३८.३० १९.३२
रत्नागिरी ५१.८१ १६.४५
सांगली ४७.९४ १४.०१
सातारा ६१.५५ १५.६२
सिंधुदुर्ग ६६.५६ १२.७०
Maharashtra Unlock : स्तरनिहाय महाराष्ट्र अनलॉक कसा होणार? काय सुरु होणार?
विभागवार माहिती
जिल्हा भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के) पॉझिटिव्हिटी दर (टक्के)
मुंबई
मुंबई-उपनगर १२.५१ ५.२५
ठाणे १९.२५ ७.५४
कोकण
पालघर ४८.९३ ५.११
रायगड ३८.३० १९.३२
रत्नागिरी ५१.८१ १६.४५
सिंधुदुर्ग ६६.५६ १२.७०
पश्चिम महाराष्ट्र
पुणे २०.४५ १३.६२
सोलापूर ४४.३९ ६.७८
कोल्हापूर ७१.५० १५.२५
सांगली ४७.९४ १४.०१
सातारा ६१.५५ १५.६२
उत्तर महाराष्ट्र
नाशिक १८.७१ ७.७५
नगर २४.४८ ४.३०
धुळे ४.२५ २.५४
जळगाव १५.१७ १.६७
नंदुरबार २९.४३ ३.३१
मराठवाडा -
औरंगाबाद २०.३४ ५.३८
उस्मानाबाद ३१.०९ ७.७०
जालना १७.६५ २.०५
लातूर १५.१३ ४.२४
नांदेड ४.२८ १.९३
हिंगोली २९.३४ ४.३७
बीड ४७.१४ ८.४०
परभणी १६.०२ ७.१०
विदर्भ -
नागपूर ८.१३ ३.८६
चंद्रपूर ९.३० ३.०९
गोंदिया ६.३२ २.३७
यवतमाळ १३.५८ ४.१९
अकोला ४३.०४ ७.७४
अमरावती २८.५९ ६.५६
भंडारा ४.४१ ७.६७
गडचिरोली ५.९२ ६.५१
वर्धा ४.०४ ७.५७
वाशिम १८.९० ५.१९
बुलडाणा ७.७१ १०.०३